LIC Stock Price at Lifetime High: भारतीय आयुर्विमा महामंडळ, म्हणजेच LIC साठी आजचा अतिशय चांगला ठरला. आज LIC च्या शेअर्सने सर्वकालीन उच्चांक गाठला आणि पहिल्यांदाच रु. 1000 ची पातळी ओलांडली. इशू झाल्यापासून पहिल्यांदाच LIC चा शेअर 1028 रुपयांच्या पातळीवर पोहचला. पण, नंतर यात थोडी घसरण दिसून आली.
आज बाजार सुरू होताच LIC चे शेअर्स 8.8 टक्क्यांनी वाढून 1028 रुपये प्रति शेअरवर पोहोचले. स्टॉकची ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. अदानी-हिंडेनबर्क प्रकरणादरम्यान शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. पण, नंतर शेअर सावरत गेला आणि दर महिन्याला नवनवीन रेकॉर्ड केले. गेल्या काही महिन्यांतील रेकॉर्ड पाहिल्यास, हा शेअर नोव्हेंबर 2023 मध्ये 12.38 टक्के तर डिसेंबरमध्ये 22.52 टक्क्यांच्या वाढीसह आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा देत आहे. विशेष म्हणजे, जानेवारी 2024 मध्येही या शेअरने गुंतवणूकदारांना 14 टक्के बंपर परतावा दिला आहे.
एलआयसीचे बाजार भांडवल विक्रमी पातळीवरLIC चे बाजार भांडवल आज 6.50 लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून, ही भारतातील सहावी सर्वात मोठी सूचीबद्ध कंपनी बनली आहे. सरकारी सूचिबद्ध PSU कंपन्यांमध्ये देखील एलआयसी आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, भारतातील सर्वात मोठ्या IPO चा विक्रमदेखील LIC च्या नावावर आहे. LIC ने दीर्घ प्रतीक्षेनंतर मे 2022 मध्ये आपला IPO लाँच केला होता. LIC च्या IPO चा आकार सुमारे 21 हजार कोटी रुपये होता.
(टीप- शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीची असू शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)