Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC ची Unclaimed Amount घसबसल्या चेक करता येणार, जाणून घ्या, सोपी आहे पद्धत

LIC ची Unclaimed Amount घसबसल्या चेक करता येणार, जाणून घ्या, सोपी आहे पद्धत

मुदतपूर्तीनंतरही बराच काळ पैसे काढले गेले नाहीत, तर त्याला अनक्लेम्ड अमाऊंट म्हणतात. परंतु ही रक्कम आता घरबल्याही तपासू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 11:19 AM2023-08-31T11:19:32+5:302023-08-31T11:20:49+5:30

मुदतपूर्तीनंतरही बराच काळ पैसे काढले गेले नाहीत, तर त्याला अनक्लेम्ड अमाऊंट म्हणतात. परंतु ही रक्कम आता घरबल्याही तपासू शकता.

LIC Unclaimed Amount can be checked instantly know easy method irdai money status check | LIC ची Unclaimed Amount घसबसल्या चेक करता येणार, जाणून घ्या, सोपी आहे पद्धत

LIC ची Unclaimed Amount घसबसल्या चेक करता येणार, जाणून घ्या, सोपी आहे पद्धत

आजकाल लोक एकाच वेळी अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करतात. बँक खात्यातून पैसे आपोआप कापले जात राहतात आणि लोकांना याची कल्पनाही नसते. अनेकवेळा स्कीम मॅच्युअर होते आणि आपल्या लक्षातही येत नाही. मुदतपूर्तीनंतरही बराच काळ पैसे काढले गेले नाहीत, तर त्याला अनक्लेम्ड अमाऊंट (Unclaimed Amount) म्हणतात. याशिवाय पॉलिसीधारकाचा समजा मृत्यू झाला आणि नॉमिनी पैशाचा दावा करू शकला नाही, तर अशा परिस्थितीत त्या पैशाला अनक्लेम्ड अमाऊंट (Unclaimed Amount) म्हणतात.

आपल्याकडे कोट्यवधींची अनक्लेम्ड अमाऊंट असल्याचं काही महिन्यांपूर्वी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच एलआयसीनं सांगितलं होतं. एलआयसीनं आपला आयपीओ आणताना ही माहिती दिली होती. परंतु या प्रकरणात काळजी करण्याची गरज नाही कारण एलआयसी पॉलिसीधारकांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना अशी सुविधा प्रदान करते की ते मृत्यूचा दावा, मॅच्युरिटी दावा, प्रीमियम परतावा किंवा इतर कोणत्याही प्रकारची दावा न केलेली रक्कम सहजपणे तपासू शकतात. पाहूया कशी तपासता येईल ही रक्कम.

अशी तपासा अनक्लेम्ड अमाऊंट
दावा न केलेली रक्कम तपासण्यासाठी, तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर, सर्वात खाली या आणि तेथे दिलेल्या पर्यायांपैकी Unclaimed Amounts of Policyholders वर जा आणि क्लिक करा. यानंतर एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला पॉलिसी क्रमांक, पॉलिसीधारकाचे नाव, जन्मतारीख आणि पॅन कार्ड क्रमांकाची माहिती विचारली जाईल. ही माहिती दिल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावं लागेल. तुमच्याकडे एलआयसीमध्ये पैसे असल्यास, सबमिटवर क्लिक करताच त्याची माहिती तुम्हाला मिळेल. यानंतर तुम्हाला दावा अर्थात क्लेम करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

असा करा क्लेम
चेक केल्यानंतर तुम्हाला थकबाकीची रक्कम दिसली, तर तुम्हाला त्यावर दावा करण्यासाठी एलआयसी कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. यासाठी तुम्ही आधी अर्ज करावा लागेल आणि त्यासोबत तुम्हाला केवायसी द्यावे लागेल. त्यानंतर विचारलेली कागदपत्रेही सबमिट करावी लागतील. ते जमा केल्यानंतर, एलआयसीकडून रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि काही दिवसांत तुमचे पैसे पॉलिसीशी जोडलेल्या बँक खात्यात येतील.

काय आहेत निर्देश
IRDAI नं सर्व विमा कंपन्यांना यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यांच्या पोर्टलवर दावा न केलेलं खातं आणि पैशांची पूर्ण माहिती द्यावी लागेल. जर १००० रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा दावा असेल तर त्याची संपूर्ण माहिती वेबसाइटवर द्यावी लागेल. दावा १० वर्ष जुना जरी असला तरी त्याची संपूर्ण माहिती वेबसाइटवर द्यावी लागेल. 

Web Title: LIC Unclaimed Amount can be checked instantly know easy method irdai money status check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.