Lokmat Money > बिझनेस न्यूज > पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत

पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत

भारतीय आयुर्विमा कंपनी ही देशातील सर्वात मोठी आणि सरकारी विमा कंपनी आहे. एलआयसीच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता आता ५० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. ही मालमत्ता पाकिस्तान देशाच्या जीडीपीच्या दुप्पट आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 01:01 PM2024-05-29T13:01:30+5:302024-05-29T13:11:38+5:30

भारतीय आयुर्विमा कंपनी ही देशातील सर्वात मोठी आणि सरकारी विमा कंपनी आहे. एलआयसीच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता आता ५० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. ही मालमत्ता पाकिस्तान देशाच्या जीडीपीच्या दुप्पट आहे.

LIC's assets are twice the GDP of Pakistan | पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत

पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत

भारतीय आयुर्विमा कंपनी ही देशातील सर्वात मोठी आणि सरकारी विमा कंपनी आहे. देशातील अनेकांचा या कंपनीवर विश्वास आहे, यामुळे अनेकांनी यात मोठी गुंतवणूक केली आहे.  एलआयसीची संपत्ती पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट आहे. एलआयसीच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता आता ५० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. एलआयसीची संपत्ती वर्षभरात १६.४८% वाढून मार्च अखेरपर्यंत ५१,२१,८८७ कोटी रुपये झाली आहे, आर्थिक वर्ष २०२३ च्या अखेरीस ते ४३,९७,२०५ कोटी रुपये होते.

'एलआयसी'ची मोठी तयारी! आता LIC देणार हेल्थ इन्शुरन्स; कंपनीने दिले संकेत

आयएमएफच्या मते, पाकिस्तानचा जीडीपी फक्त ३३८.२४ अब्ज डॉलर आहे. या संदर्भात एलआयसीचे AUM अंदाजे ६१६ अब्ज डॉलर आहे, हे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या जवळपास दुप्पट आहे. ही रक्कम पाकिस्तान (३३८ अब्ज डॉलर), नेपाळ (४४.१८ अब्ज डॉलर) आणि श्रीलंका (७४.८५ अब्ज डॉलर) या तीन शेजारी देशांचा जीडीपी एकत्रित केला तरीही एलआयसीची संपत्ती जास्त होते.

कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. " एलआयसी आरोग्य विमा क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी काम करत आहे, परवानगी देण्यासाठी विमा कायद्यात सुधारणा केल्या जातील, असं एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती म्हणाले. विमा कायदा १९३८ आणि भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरणच्या नियमांनुसार, विमा कंपनीला एकाच युनिट अंतर्गत जीवन, सामान्य किंवा आरोग्य विमा घेऊन जाण्यासाठी संमिश्र परवाना धारण करण्याची परवानगी नाही. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी आर्थिक अहवाल दिला. या अहवालात मोहंती म्हणाले की, एलआयसी अग्निशमन आणि अभियांत्रिकी सारख्या सामान्य विम्यामध्ये विशेषज्ञ नाही, पण आरोग्य विमा सुरू करू शकते. यावर  काम सुरू आहे. 

LIC देणार हेल्थ इन्शुरन्स

देशात कोरोना महामारीमुळे हेल्थ इन्शुरन्सची मोठी मागणी वाढली आहे. अनेकांना या इन्शुरन्सचे महत्व कळाले आहे. मार्केटमध्ये हेल्थ इन्शुरन्स देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, आपल्या देशात एलआयसी या विमा कंपनीच्या पोलिसींना मोठी मागणी असते. पण, एलआयसी अजुनही 'हेल्थ इन्शुरन्स' योजना सुरू केली नव्हती. पण, आता एलआयसी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. आता एलआयसी 'हेल्थ इन्शरन्स'क्षेत्रात पाऊलं टाकणार आहे.  

Web Title: LIC's assets are twice the GDP of Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.