Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC चा मोठा निर्णय! आता देशातील कोणत्याही ब्रांचमध्ये जमा करू शकता मॅच्युरिटी डॉक्युमेंट्स

LIC चा मोठा निर्णय! आता देशातील कोणत्याही ब्रांचमध्ये जमा करू शकता मॅच्युरिटी डॉक्युमेंट्स

Life Insurance Corporation: एलआयसी पॉलिसी मॅच्युरिटी क्लेम पेमेंटसाठी LIC policy maturity claim) ग्राहक देशातील कोणत्याही एलआयसी शाखेत कागदपत्रे जमा करु शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 04:41 PM2021-03-19T16:41:20+5:302021-03-19T16:41:55+5:30

Life Insurance Corporation: एलआयसी पॉलिसी मॅच्युरिटी क्लेम पेमेंटसाठी LIC policy maturity claim) ग्राहक देशातील कोणत्याही एलआयसी शाखेत कागदपत्रे जमा करु शकतात.

LIC's big decision! Maturity documents can now be deposited at any branch in the country | LIC चा मोठा निर्णय! आता देशातील कोणत्याही ब्रांचमध्ये जमा करू शकता मॅच्युरिटी डॉक्युमेंट्स

LIC चा मोठा निर्णय! आता देशातील कोणत्याही ब्रांचमध्ये जमा करू शकता मॅच्युरिटी डॉक्युमेंट्स

Highlightsएलआयसीची देशभरात 113 विभागीय कार्यालये, 2,048 शाखा आणि 1,526 छोटी कार्यालये आहेत. याशिवाय यामध्ये 74 ग्राहक झोन आहेत.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी जीवन विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळाने (Life Insurance Corporation) आपल्या कोट्यावधी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आता एलआयसी पॉलिसी मॅच्युरिटी क्लेम पेमेंटसाठी LIC policy maturity claim) ग्राहक देशातील कोणत्याही एलआयसी शाखेत कागदपत्रे जमा करु शकतात. दरम्यान, मॅच्युरिटी क्लेमची प्रक्रिया फक्त मूळ शाखेतून केली जाईल. (lic policyholders to deposit claims at any office till march end) 

एलआयसीने याबाबतची माहिती ट्विट करुन दिली आहे. एलआयसीने म्हटले आहे की, पॉलिसीधारक महिन्याच्या अखेरीस देशातील जवळच्या कोणत्याही एलआयसी कार्यालयात (LIC Office) पॉलिसीच्या मॅच्युरिटीचा दावा करण्यासाठी कागदपत्रे सादर करु शकतात. एलआयसीच्या या घोषणेनंतर अशा पॉलिसीधारकांना मोठा दिलासा मिळेल, की ज्यांची पॉलिसी मॅच्योर झाली आहे.

2 हजारपेक्षा जास्त शाखा
एलआयसीची देशभरात 113 विभागीय कार्यालये, 2,048 शाखा आणि 1,526 छोटी कार्यालये आहेत. याशिवाय यामध्ये 74 ग्राहक झोन आहेत. जिथे त्यांच्या पॉलिसीचे मॅच्युरिटी क्लेम फॉर्म पॉलिसीधारकांकडून स्वीकारले जातील. कोणत्याही शाखेतून घेतलेल्या पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर ग्राहक क्लेम फॉर्म कुठेही जमा करू शकतील.

(मोदी सरकारची खास योजना! केवळ 42 रुपये जमा केल्यावर मिळतील 12 हजार)

चाचणी प्रक्रियेनंतर अंमलात येईल
एलआयसीचे म्हणणे आहे की, ही सुविधा चाचणी म्हणून सुरू केली गेली आहे आणि त्वरित अंमलात आली आहे. ही सुविधा 31 मार्च रोजी कालबाह्य होत आहे. दरम्यान, एलआयसीमध्ये सध्या 29 कोटींपेक्षा जास्त पॉलिसीधारक आहेत. विमा व्यवसायात एलआयसी ही प्रथम क्रमांकावर विश्वासार्ह कंपनी आहे. एलआयसीमध्ये गुंतवणूक केलेले त्यांचे पैसे कधीही बुडणार नाहीत, असा लोकांना विश्वास आहे. अलीकडेच कंपनीने आपले नवीन पॉलिसी बचत प्लस बाजारात आणली आहे. यात सुरक्षेसह बचत करण्याचीही सुविधा आहे. या योजनेचा मुदतपूर्ती कालावधी पाच वर्षांचा आहे.

(जबरदस्त! आता LIC शी निगडीत सर्व कामे घरबसल्या शक्य; कसे? जाणून घ्या)

Web Title: LIC's big decision! Maturity documents can now be deposited at any branch in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.