Jeevan Shiromani Plan Benefits: जर तुम्ही एलआयसीच्या विमा योजना घेतल्या असतील किंवा घेण्याच्या विचारात आहात तर सध्याच्या घडीला सर्वात चांगला विमा हा एलआयसी जीवन शिरोमणी प्लॅन (LIC jeevan shiromani Plan) आहे. यामध्ये तुम्हाला 1 रुपयाच्या बदल्यात चांगला फायदा मिळणार आहे. एलआयसी सर्व गटातील लोकांचा विचार करून वेगवेगळ्या योजना आणत असते. पॉलिसी तयार करत असते. (Jeevan Shiromani Yojana: Get 3 Big Benefits with This Non-Linked LIC Plan; Details Inside)
Saving Tips: महिलांसाठी LIC चा जबरदस्त प्लॅन; पॉलिसीसाठी फक्त आधार कार्ड लागणार, जाणून घ्या...
Jeevan Shiromani Plan पॉलिसी ही विम्यासह तुम्हाला बचतीचा देखील पर्याय देते. LIC ची ही पॉलिसी एक नॉन लिंक्ड पॉलिसी आहे. यामध्ये तुम्हाला 1 कोटी रुपयांच्या रकमेची गॅरंटी दिली जाते. ग्राहकांना त्यांचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी एलआयसीने ही पॉलिसी आणली आहे. LIC ने Jeevan Shiromani 847 पॉलिसीची सुरुवात 19 डिसेंबर 2017 मध्ये केली होती. ही एक नॉन लिंक्ड, नियंत्रित प्रीमियम पेमेंट मनी बॅक योजना आहे. ही बाजारातील फायद्याशी जोडलेली योजना आहे. ही योजना उच्च उत्पन्न गटासाठी प्रामुख्याने बनविण्यात आली आहे. या योजनेद्वारे गंभीर आजारांनाही कव्हर केले जाते. तसेच यामध्ये राय़डर निवडीचे तीन पर्याय आहेत.
जीवन शिरोमणी प्लॅनद्वारे विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना आर्थिक पाठबळ मिळते. पॉलिसीधारक जिवंत असेल तर ठराविक काळासाठी पेमेंट सुविधा देण्यात आली आहे. तसेच मुदत संपली की १ कोटी रक्कम देण्यात येते.
काय आहेत नियम...- सम अश्युअर्ड -1 कोटी रुपयापासून सुरु.- पॉलिसी टर्मः 14, 16, 18 आणि 20 वर्षे- प्रिमिअम जमा करण्याचा अवधी - 4वर्षे- पॉलिसीधारकाचे वय - 18 ते 55 वर्षे.