Join us

जबरदस्त! LIC च्या नवीन पॉलिसी धारकांना दुहेरी फायदा, डेथ क्लेममध्ये प्रीमियम रकमेच्या 125% रक्कम मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 11:31 AM

एलआयसी जीवन किरण लाइफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये, जमा केलेला एकूण प्रीमियम मुदतपूर्तीपर्यंत जिवंत राहिल्यावर परत केला जातो, तर मृत्यू झाल्यास 125% प्रीमियम गुंतवणूकदाराच्या जवळच्या नातेवाईकांना दिला जातो.

एलआयसीची नवीन पॉलिसी जीवन किरण लाइफ इन्शुरन्स गुंतवणूकदारांना दुहेरी लाभ देत आहे. या पॉलिसी धारकांना बचतीचा लाभ मिळतो आणि दुसरे म्हणजे त्यांना जीवन विम्याचा लाभ मिळतो. पॉलिसीच्या कालावधीत विमाधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास, 125% पर्यंत प्रीमियम कुटुंबाला दिला जातो. यामध्ये मुदतीपर्यंत जीवंत राहिल्यास जमा केलेला एकूण प्रीमियम गुंतवणूकदाराला परत केला जातो. तर धूम्रपान करणाऱ्यांसाठी प्रीमियम दर देखील भिन्न आहेत.

RBI नं व्याजदर वाढवले नाही, तरी का महाग होतायत लोन? तीन सरकारी बॅंकांचा ग्राहकांना झटका

LIC ने गेल्या महिन्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जीवन किरण जीवन विमा पॉलिसी लाँच केली. ही एक नॉन-लिंक्ड, गैर-सहभागी वैयक्तिक बचत योजना तसेच जीवन विमा योजना आहे. ALIC ने या पॉलिसीमध्ये धूम्रपान करणाऱ्या आणि धूम्रपान न करणाऱ्यांसाठी वेगवेगळे प्रीमियम दर निर्धारित केले आहेत.

एलआयसी जीवन किरण लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकूण जमा प्रीमियम रक्कम पॉलिसीधारकाला मॅच्युरिटीवर दिली जाते. पॉलिसी अंमलात असल्यास, मॅच्युरिटीवरील विमा रक्कम एलआयसीकडून नियमित प्रीमियम किंवा सिंगल प्रीमियम पेमेंट अंतर्गत प्राप्त झालेल्या एकूण प्रीमियमच्या बरोबरीची असेल.

पॉलिसीधारकाची पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेनंतर परंतु मुदतपूर्तीच्या नमूद तारखेपूर्वी पॉलिसी मुदतीच्या आत मृत्यू झाल्यास, विम्याची रक्कम दिली जाईल. हे पेमेंट नियमित आणि एकल प्रीमियमच्या आधारावर असेल. या योजनेत पहिल्या वर्षातील आत्महत्या वगळता अपघाती मृत्यूंसह सर्व प्रकारच्या मृत्यूंचा समावेश आहे.

नियमित प्रीमियम पेमेंट पॉलिसी अंतर्गत, मृत्यू झाल्यास, वार्षिक प्रीमियमच्या 7 पट किंवा मृत्यूच्या तारखेपर्यंत जमा केलेल्या एकूण प्रीमियमच्या 105%, किंवा मूळ विम्याची रक्कम दिली जाईल. सिंगल प्रीमियम पेमेंट पॉलिसी अंतर्गत, सिंगल प्रीमियमच्या 125% मृत्यूनंतर भरले जातील. याशिवाय, मूळ विमा रक्कम दिली जाईल.

पेमेंटचे पर्याय

पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास पेमेंटची पद्धत पॉलिसीधारक पॉलिसी घेताना किंवा मृत्यूपूर्वी निवडू शकतो. यामध्ये, नॉमिनीला एकरकमी पेमेंट पर्याय देण्याव्यतिरिक्त, एकूण रक्कम हप्त्यांमध्ये म्हणजेच 5 समान हप्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय देखील आहे. दोन पर्यायांपैकी कोणताही एक विमाधारक निवडू शकतो.

LIC जीवन किरण जीवन विमा पॉलिसी अंतर्गत किमान मूळ विमा रक्कम 15,00,000 रुपये आहे आणि कमाल मूलभूत विमा रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. पॉलिसीचा किमान कालावधी 10 वर्षे आणि कमाल पॉलिसीचा कालावधी 40 वर्षे आहे. गृहिणी आणि गर्भवती महिला या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.

टॅग्स :एलआयसीव्यवसाय