नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) पॉलिसीधारकांना मोठा दिलासा दिला आहे. ही बातमी अशा लोकांसाठी आहे ज्यांची पॉलिसी लॅप्स झाली आहे. पॉलिसी लॅप्स झालेल्या ग्राहकांना LICने मोठा दिलासा दिला आहे. अशा ग्राहकांना विलंब शुल्क भरुन रद्द झालेली पॉलिसी पुन्हा चालू करता येणार आहे.
देशभरात विशेष मोहीम सुरू आहे
तुम्हाला दीर्घकाळापासून लॅप्स असलेली पॉलिसी सुरू करण्याची चांगली संधी आली आहे. LIC ने लॅप्स पॉलिसीचा प्रीमियम जमा करण्यासाठी 25 मार्च 2022 पर्यंत वेळ दिला आहे. या योजनेअंतर्गत, टर्म इंन्शुरन्स, मल्टीपल रिस्क पॉलिसीज इत्यादी उच्च जोखीम विमा योजनांच्या बाबतीत विलंब शुल्क माफी दिली जाणार नाही. यासाठी एलआयसीकडून देशभरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
विशेष मोहिमेची माहिती
प्रीमियममध्ये डिफॉल्टची तारीख 5 वर्षांपेक्षा जास्त जुनी नसावी. म्हणजेच, तुम्ही पहिल्या प्रीमियम पेमेंटमध्ये डीफॉल्ट झाल्यानंतर 5 वर्षांच्या आत पॉलिसी पुन्हा चालू करू शकता. टर्म इन्शुरन्स, मल्टीपल रिस्क पॉलिसीज इत्यादी उच्च जोखीम योजनांच्या बाबतीत विलंब शुल्क माफी स्वीकारली जाणार नाही. प्रीमियम भरण्याची मुदत संपून गेलेल्या आणि ज्या पॉलिसीची मुदत पुनरुज्जीवन तारखेपर्यंत पूर्ण झालेली नाही अशा पॉलिसी या मोहिमेत सुरू केल्या जाऊ शकतात.
जाणून घ्या तुम्हाला किती सूट मिळेल
या योजनेअंतर्गत, पारंपारिक आणि आरोग्य विम्याच्या विलंब शुल्कावर 1 लाख रुपयांच्या प्रीमियमसह 20 टक्के किंवा कमाल 2 हजार रुपयांची सूट दिली जाईल. तर, पॉलिसीच्या विलंब शुल्कावर 1 लाख 1 रुपये ते 3 लाख रुपयांच्या प्रीमियमवर 25 टक्के किंवा कमाल 2,500 रुपयांची सूट असेल. याशिवाय, 3 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियमसह पॉलिसीच्या विलंब शुल्कावर 30 टक्के किंवा कमाल 3000 रुपयांची सूट दिली जाईल.