Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीवन विमा कंपन्यांचा प्रीमियम १३ टक्क्यांनी वाढला;आयआरडीएआयने जारी केला वार्षिक अहवाल

जीवन विमा कंपन्यांचा प्रीमियम १३ टक्क्यांनी वाढला;आयआरडीएआयने जारी केला वार्षिक अहवाल

सार्वजनिक क्षेत्राचा नफा 800 टक्के होता, तर खाजगी विमा कंपन्यांनी एकूण 72.36 टक्के वाढ नोंदवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 07:50 PM2023-12-28T19:50:28+5:302023-12-28T20:08:50+5:30

सार्वजनिक क्षेत्राचा नफा 800 टक्के होता, तर खाजगी विमा कंपन्यांनी एकूण 72.36 टक्के वाढ नोंदवली आहे.

Life insurance companies' premiums rise by 13 percent; IRDAI releases annual report | जीवन विमा कंपन्यांचा प्रीमियम १३ टक्क्यांनी वाढला;आयआरडीएआयने जारी केला वार्षिक अहवाल

जीवन विमा कंपन्यांचा प्रीमियम १३ टक्क्यांनी वाढला;आयआरडीएआयने जारी केला वार्षिक अहवाल

नवी दिल्ली: जीवन विमा कंपन्यांचे प्रीमियम उत्पन्न गेल्या आर्थिक वर्षात 12.98 टक्क्यांनी वाढून 7.83 लाख कोटी रुपये झाले आहे. तर सामान्य विमा कंपन्यांचे प्रीमियम उत्पन्न 16.4 टक्क्यांनी वाढून 2.57 लाख कोटी रुपये झाले.

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने आपल्या वार्षिक अहवाल 2022-23 मध्ये म्हटले आहे की, खाजगी क्षेत्रातील जीवन विमा कंपन्यांनी प्रीमियममध्ये 16.34 टक्के वाढ नोंदवली आहे तर सार्वजनिक क्षेत्रातील जीवन विमा कंपन्यांनी प्रीमियममध्ये 10.90 टक्के वाढ नोंदवली आहे.

जीवन विमा कंपन्यांच्या एकूण प्रीमियम उत्पन्नामध्ये जुन्या पॉलिसीच्या नूतनीकरण प्रीमियमचा वाटा 52.56 टक्के आहे. तर नवीन पॉलिसीच्या प्रीमियमचा वाटा 47.44 टक्के आहे. IRDAIने सांगितले की, 2022-23 या आर्थिक वर्षात जीवन विमा कंपन्यांनी वैयक्तिक विभागात 284.70 लाख नवीन पॉलिसी जारी केल्या आहेत. 

सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांनी 204.29 लाख पॉलिसी (71.75 टक्के) आणि खाजगी जीवन विमा कंपन्यांनी 80.42 लाख पॉलिसी (28.25 टक्के) जारी केल्या. जीवन विमा उद्योगाचा निव्वळ नफा गेल्या आर्थिक वर्षात पाच पटीने वाढून रु. 42,788 कोटी झाला आहे, जो एका वर्षापूर्वी रु. 7,751 कोटी होता. यामध्ये सार्वजनिक क्षेत्राचा नफा 800 टक्के होता, तर खाजगी विमा कंपन्यांनी एकूण 72.36 टक्के वाढ नोंदवली आहे.

Web Title: Life insurance companies' premiums rise by 13 percent; IRDAI releases annual report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.