Join us

क्रेडिट कार्ड असो किंवा लाईट बिल, Amazon Pay च्या मदतीनं भरा एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 5:23 PM

आपल्यापैकी अनेकांनी ॲमेझॉनवरून शॉपिंगचा अनुभव तर घेतलाच असेल. पण आता 'ॲमेझॉन पे'च्या माध्यमातून बिल भरणंही सोपं झालंय.

आपल्यापैकी अनेकांनी ॲमेझॉनवरून शॉपिंगचा अनुभव तर घेतलाच असेल. पण आता Amazon Pay च्या माध्यमातून बिल भरणंही सोपं झालंय. आता घरबसल्या केवळ एका क्लिकवर तुम्ही तुमच्या बिलांचा भरणा करू शकता. यामध्ये तुमचं इलेक्ट्रिक बिल असो किंवा क्रेडिट कार्ड बिल, मोबाईल बिल असो किंवा तुमचं गॅस सिलिंडरचं बिल, अगदी सहजरित्या ते भरणं शक्य झालंय.

तुम्ही जर ॲमेझॉनद्वारे खरेदी करत असाल किंवा तुमचं ॲमेझॉनवर अकाऊंट असेल तर तुम्ही सहजरित्या Amazon Pay द्वारे तुमच्या निरनिराळ्या बिलांचाही भरणा करू शकता. यामध्ये तुम्ही तुमचं इलेक्ट्रिक बिल, गॅस बिल, मोबाईलचं बिल, क्रेडिट कार्डाचं बिल, गॅस पाईपलाईनचं बिल, पाण्याचं बिल, लँडलाईन, ब्रॉडबँड, केबल टीव्हीचं बिलही भरू शकता. इतकंच नाही तर ॲमेझॉन पे द्वारे तुम्हाला लोन रिपेमेंट, इन्शुरन्स प्रिमिअम, एज्युकेशन फी, विमानाची तिकिटं, बस तिकिट, ट्रेनचं तिकंट, इतकंच नाही तर कार आणि बाईकचा इन्शुरन्सही भरू शकता.

तुम्ही तुमच्या Amazon Pay बॅलन्स, नेट बँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, युपीआयद्वारे कोणतीही बिलं भरू शकता. तुम्हाला दे बिल भरायचं आहे त्या पर्यायावर क्लिक करू तुमची काही माहिती भरुन सहजरित्या तुम्ही तुमचं बिल भरू शकता. Amazon Pay च्या माध्यमातून तुम्ही ५० हजार रुपयांपर्यंतच्या बिलांचा भरणा करू शकता. Amazon Pay सर्वात झटपट पेमेंटसाठीच ओळखलं जातं. ॲमेझॉन पे वापरणाऱ्या यूझर्सनंही यावर शिक्कामोर्तब केलंय. Amazon Pay वापरण्यास सोपं असल्यामुळे ८६ टक्के यूझर्सनं ९ ते १० गुण दिलेत. तर झटपट पेमेंटच्याबाबतीत ८४ टक्के यूझर्सनं पसंती Amazon Pay  ला पसंती दाखवलीये.

आता नक्कीच म्हणता येईल#AbHarDinHuaAasan.