परळी : महाजनकोकडून आदेश येताच येथील नवीन परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच मंगळवारपासून कार्यान्वित करण्यात आले. राज्यात विजेची मागणी कमी असल्याने येथील विद्युत निर्मिती केंद्रातील हे तीन संच गेल्या महिन्यात बंद ठेवण्याचा निर्णय महाजनकोने घेतला होता. आता परत हे बंद संच सुरू करण्यात आले आहे.
नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत. या तीन संचाची मिळून स्थापित क्षमता ७५० मेगावॅट एवढी आहे. तीन संच सुरू करण्याची प्रक्रिया सोमवारी रात्री सुरू झाली. मंगळवारपासून पूर्ण क्षमतेने या तीन संचातून वीज निर्मितीस प्रारंभ झाला आहे. नवीन परळी विद्युत केंद्राच्या संचाला वीजनिर्मितीसाठी लागणारा दगडी कोळसा १५ दिवस पुरेल एवढा उपलब्ध आहे. अंदाजे दीड लाख टन कोळसा साठा शिल्लक आहे. तसेच परभणी जिल्ह्यातील खडका बंधाऱ्यातून पाणी पुरविले जाते.
परळीत वीजनिर्मिती संच झाले सुरू
महाजनकोकडून आदेश येताच येथील नवीन परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच मंगळवारपासून कार्यान्वित करण्यात आले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 03:43 AM2019-11-13T03:43:17+5:302019-11-13T03:43:21+5:30