मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या मंगळवारी होणाऱ्या पतधोरण आढावा बैठकीत धोरणात्मक व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले जाण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये केलेल्या नोटाबंदीनंतरची ही रिझर्व्ह बँकेचा दुसरी पतधोरण आढावा बैठक आहे.
नोटाबंदीमुळे बँकांमध्ये निधीची उपलब्धता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे बँकांनी आपल्या व्याजदरात सुमारे १ टक्क्याची कपात केली आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. धोरण ठरविताना ही बाब रिझर्व्ह बँकेला ध्यानात घ्यावी लागणार आहे.
फिक्कीने म्हटले की, या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँक स्थिती जैसे थे ठेवण्याची शक्यता आहे. १ एप्रिल रोजीच्या पतधोरणात दरकपात होऊ शकते. डिसेंबरमधील पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने अल्पकालीन व्याजदर ६.२५ टक्क्यांवर कायम ठेवला होता. हा निर्णय घेताना अमेरिकेची संभाव्य व्याजदर वाढ रिझर्व्ह बँकेने विचारात घेतली होती. इतरही अनेक घटकांचा विचार करण्यात आला होता.
डिसेंबरमध्ये किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर वाढून ५.६१ टक्क्यांवर गेला आहे. भाजीपाला आणि अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे हा दर वाढला होता. त्यातच आता कच्च्या तेलाच्या किमती वाढून ५५ डॉलर प्रतिबॅरल झाल्या आहेत. दरम्यान, सूक्ष्म आर्थिक आकडेवारीनुसार, सेवा क्षेत्रात जानेवारीत सलग तिसऱ्या महिन्यात घसरण झाली आहे. निक्केई सर्व्हिसेस पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्सनुसार (पीएमआय) डिसेंबरमध्ये कच्च्या मालाची महागाई कमी झाली आहे. ही स्थिती व्याजदर कपातीस पूरक आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
व्याजदर ‘जैसे थे’ राहण्याची शक्यता
रिझर्व्ह बँकेच्या मंगळवारी होणाऱ्या पतधोरण आढावा बैठकीत धोरणात्मक व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले जाण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये केलेल्या नोटाबंदीनंतरची ही रिझर्व्ह बँकेचा दुसरी पतधोरण आढावा बैठक आहे.
By admin | Published: February 7, 2017 01:55 AM2017-02-07T01:55:55+5:302017-02-07T01:55:55+5:30