Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘लीला’ने थकविले एलआयसीचे व्याज

‘लीला’ने थकविले एलआयसीचे व्याज

आर्थिक संकटात सापडलेली अतिथ्य क्षेत्रातील कंपनी हॉटेल लीला व्हेंचरने भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) २.१२ कोटी रुपयांचे तिमाही व्याज थकविले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 03:57 AM2018-09-21T03:57:31+5:302018-09-21T03:57:45+5:30

आर्थिक संकटात सापडलेली अतिथ्य क्षेत्रातील कंपनी हॉटेल लीला व्हेंचरने भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) २.१२ कोटी रुपयांचे तिमाही व्याज थकविले आहे.

 Lila's tired LIC's interest | ‘लीला’ने थकविले एलआयसीचे व्याज

‘लीला’ने थकविले एलआयसीचे व्याज

नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेली अतिथ्य क्षेत्रातील कंपनी हॉटेल लीला व्हेंचरने भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) २.१२ कोटी रुपयांचे तिमाही व्याज थकविले आहे. ते फेडण्यासाठी कंपनी आता काही हॉटेलांची विक्री करण्याचा विचार करीत आहे.
लीला व्हेंचरवर ३,६00 कोटींचे कर्ज आहे. कंपनीने डिसेंबर २00८मध्ये एलआयसीला रिडिमेबल नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स देऊन ९0 कोटींजे कर्ज घेतले होते. यावरील व्याजदर तीन महिन्यांनी भरणे अपेक्षित आहे. तथापि, १९ सप्टेंबर २0१८ला संपलेल्या तिमाहीतील व्याजाचा २.१२ कोटी रुपयांचा भरणा कंपनीला करता आलेला नाही.

Web Title:  Lila's tired LIC's interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.