Join us

Pan-Aadhaar Link: आता 'या' पॅनकार्डचा काही उपयोग नाही! आयकर विभागाने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 2:28 PM

पॅन आधार लिंक करण्यासाठी आयकर विभागाने सूचना दिल्या आहेत. गेल्या काही महिन्यांची यासाठी मुदत देण्यात आली होती, आता आयकर विभागाने पॅन आधार लिंक करण्यासाठी मुदत देण्यास नकार दिला आहे.

पॅन आधार लिंक करण्यासाठी आयकर विभागाने सूचना दिल्या आहेत. गेल्या काही महिन्यांची यासाठी मुदत देण्यात आली होती, आता आयकर विभागाने पॅन आधार लिंक करण्यासाठी मुदत देण्यास नकार दिला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने 30 जूनपासून आधार आणि पॅनशी लिंक करण्यासाठी 1000 रुपयांचा दंड आकारला आहे. दंड भरल्याशिवाय कोणीही आपला पॅन आधारशी लिंक करू शकणार नाही. 31 मार्च 2023 पर्यंत पॅन आधारशी लिंक करता येणार आहे. 

आयकर विभागाने पॅनशी आधार लिंक न करणाऱ्यांना इशारा दिला आहे. या संदर्भात इन्कम टॅक्स विभागाने ट्विट  करुन माहिती दिली आहे. 'आयकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅन धारकांसाठी 31.3.2023 रोजी आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख आहे. जर पॅन आधारशी लिंक केले नसेल तर पॅन बाद होणार आहे, असं या ट्विटमध्ये म्हटले आहे.

स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये येणार नाही प्रॉब्लेम, या ५ टिप्स वाढवतील बॅटरीची लाईफ

'जे आधार कार्ड पॅनशी लिंक करणार नाहीत त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. यानंतर, पॅन कार्डधारक म्युच्युअल फंड, स्टॉक आणि बँक खाती उघडणे यासारख्या गोष्टी करू शकणार नाहीत. याशिवाय तुम्ही तुमचे बंद पॅन कार्ड कागदपत्र म्हणून कुठेही वापरत असाल तर तुम्हाला दंडही होऊ शकतो. आयकर कायदा 1961 च्या कलम 272B अंतर्गत, तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड देखील भरावा लागू शकतो, असं आयकर विभागाने म्हटले आहे. 

असं करा आधारशी पॅन लिंक 

आयकरच्या अधिकृत वेबसाइट ww.incometax.gov.in वर लॉग इन करा आणि क्विक लिंक्सवर जा आणि आधार लिंक वर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर एक नवीन विंडो ओपन होईल. तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक येथे टाका. 'I validate my Aadhaar details' हा पर्याय निवडा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP प्राप्त होईल. ते भरा आणि नंतर 'Validate' वर क्लिक करा. दंड भरल्यानंतर तुमचा पॅन आधारशी लिंक केला जाईल.

टॅग्स :पॅन कार्डआधार कार्ड