Join us  

SBI Alert : एसबीआयचा ग्राहकांना हाय अलर्ट! ...तर बंद होणार आपली बँकिंग सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 4:07 PM

केंद्र सरकारने कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर पॅन आधारला लिंक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 वरून वाढवून 31 मार्च 2022 केली होती. 

नवी दिल्ली - देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकां अलर्ट केले आहे. बँकेने आपल्या खातेदारांना 31 मार्च 2022 पूर्वी पॅन-आधार कार्ड लिंक करण्यास सांगितले आहे. जर ग्राहकांनी असे केले नाही, तर त्यांची बँकिंग सेवा बंद होऊ शकते, असे बँकेने म्हटले आहे. यासंदर्भात एसबीआयने ट्विटही केले आहे. (PAN-Aadhaar Link)31 मार्चपर्यंत आहे वेळ -एसबीआयने म्हटले आहे की, 'कुठल्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी आणि अखंडित बँकिंग सेवेचा आनंद घेण्यासाठी, आम्ही आमच्या ग्राहकांना पॅन आधारशी लिंक करण्याचा सल्ला देत आहोत.' याच बरोबर, 'पॅन आधारला लिंक करणे अनिवार्य आहे. जर पॅन आणि आधार लिंक नसेल, तर पॅन निष्क्रिय होईल आणि स्पेसिफाइड ट्रांझेक्शन करण्यासाठी  पॅनचा वापर केला जाऊ शकणार नाही,' असेही बँकेने म्हटले आहे.

तत्पूर्वी, केंद्र सरकारने कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर पॅन आधारला लिंक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 वरून वाढवून 31 मार्च 2022 केली होती. 

पॅन आधारला लिंक करण्याची सोपी पद्धत -- आपण PAN आणि Aadhaar ला SMS च्या माध्यमानेही लिंक करू शकता - मोबाइलच्या मेसेज बॉक्समध्ये जावून टाइप करा -  UIDPAN<12-digit Aadhaar><10-digit PAN> - हा मेसेज 567678 अथवा 56161 वर पाठवा, झाले काम...

टॅग्स :एसबीआयस्टेट बँक आॅफ इंडियाबँक