सुरेश भटेवरा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : प्रत्येक कुटुंबाचे बँकेत किमान एक खाते असावे, या इराद्याने मोदी सरकारने गाजावाजा करीत देशात २८ कोटींहून अधिक जनधन बँक खाती उघडण्याचा विक्रम केला. गेल्या ६ महिन्यांपासून मात्र या खात्यांमधे जमा झालेली रक्कम सातत्याने कमी कमी होत चालली आहे. २८ कोटींपैकी ७ कोटी खात्यांवर कोणतेही व्यवहार होत नाहीत. त्यामुळे खास या खात्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ओव्हरड्राफ्ट सुविधेवरही त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता दिसते आहे.
जनधनमधे अशी होती रक्कम
नोटाबंदीअगोदर ५0 हजार कोटी
नोटाबंदीनंतर ७१ हजार कोटी
नोटाबंदीनंतर जनधन खात्यांचे व्यवहार मोठया प्रमाणावर वाढले आणि जानेवारी महिन्यात ही रक्कम ७१ हजार कोटींवर गेली.
...तर योजना फसल्याचे चित्र येईल चव्हाट्यावर जनधन खाती ज्यांच्या नावांवर ही उघडण्यात आली आहेत, त्यांच्या उत्पन्नात दरम्यानच्या काळात कोणतीही फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे उत्पन्नातला काही भाग बँक खात्यात जमा करण्याइतकी रक्कम त्याच्या हाती राहतच नाही. याखेरीज कॅशलेस व्यवहारांचा देशात भरपूर प्रचार घडवण्यात आला तरी रोखीत व्यवहार करण्याच्या लोकांच्या सवयी देखील फारशा बदललेल्या नाहीत. जनधन खात्यातून रोख व्यवहारांसाठी पैसे काढण्याचा ट्रेंड असाच चालू राहिला तर वाजत गाजत सुरू झालेली ही योजना फसली असे चित्र लवकरच दिसू लागेल. एका उच्चपदस्थ बँक अधिकाऱ्याच्या मते नोटाबंदीपूर्वी जनधन खात्यात जमा रक्कम ज्या पातळीवर होती, आणखी काही महिन्यात ती रक्कम पुन्हा त्याच पातळीवर येईल, असा अंदाज आहे.
नोटाबंदीनंतर भरलेल्या जनधन खात्यांना गळती
मोदी सरकारने गाजावाजा करीत देशात २८ कोटींहून अधिक जनधन बँक खाती उघडण्याचा विक्रम केला.
By admin | Published: June 8, 2017 12:11 AM2017-06-08T00:11:49+5:302017-06-08T00:11:49+5:30