अोला : दलित वस्तीसह आमदार व खासदार निधीतून केलेल्या कामांची देयके प्रशासनाने जाणीवपूर्वक रखडून ठेवल्याचा आरोप करीत वहीद खान नामक कंत्राटदाराने आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या वाहनासमोर अक्षरश: लोटांगण घातल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी मनपात घडला. थकीत देयकांप्रती प्रशासन कंत्राटदारांसोबत साधी बोलणी करण्यासदेखील तयार नसल्याचा रोष व्यक्त करीत देयकांची समस्या त्वरित निकाली काढण्याची मागणी मनपा कंत्राटदार असोसिएशनच्यावतीने करण्यात आली.मनपाने दलित वस्तीसह आमदार-खासदार यांच्या निधीतून कंत्राटदारांच्या मार्फत विविध विकास कामे करवून घेतली. मागील सहा महिन्यांपासून देयके थकल्याने कंत्राटदारांमध्ये नाराजी आहे. मध्यंतरी शिवसेनेच्या एका महिला पदाधिकार्याने काही अधिकार्यांची कानउघडणी केल्यानंतर संबंधित देयकांची फाईल पुढे सरकली. तूर्तास सदर फाईल उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्याकडे असून, त्यांनी विकास क ामे करताना जे बांधकाम साहित्य खरेदी केले, त्यांच्या पावत्या जोडण्याचा नवीन निकष घालून दिला. यामुळे कंत्राटदारांच्या समस्येत भर पडली. यासंदर्भात आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर चर्चा करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे पाहून शुक्रवारी वहीद खान सह आणखी एका कंत्राटदाराने आयुक्तांच्या वाहनासमोरच लोटांगण घातले. यावेळी आयुक्तांनी देयकांच्या मुद्यावर चर्चा केली. कोट..कंत्राटदारांनी ज्या निधीतून विकास कामे केली, त्यामध्ये जाचक अटींचा समावेश नव्हता. सध्या मात्र प्रशासनाने विविध अटींची पूर्तता करण्याचे फर्मान सोडल्याने कंत्राटदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकूणच, प्रशासनाची देयके अदा न करण्याची मानसिकता दिसून येते. तसे झाल्यास भविष्यातील अनेक विकास कामे करायची किंवा नाही, याबद्दल असोसिएशन गांभीर्याने विचार करीत आहे. - संजय अग्रवाल, अध्यक्ष मनपा कंत्राटदार असोसिएशन
आयुक्तांच्या वाहनासमोर कंत्राटदारांचे लोटांगण देयके रखडली; नगरसेवकांची चुप्पी
अकोला : दलित वस्तीसह आमदार व खासदार निधीतून केलेल्या कामांची देयके प्रशासनाने जाणीवपूर्वक रखडून ठेवल्याचा आरोप करीत वहीद खान नामक कंत्राटदाराने आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या वाहनासमोर अक्षरश: लोटांगण घातल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी मनपात घडला. थकीत देयकांप्रती प्रशासन कंत्राटदारांसोबत साधी बोलणी करण्यासदेखील तयार नसल्याचा रोष व्यक्त करीत देयकांची समस्या त्वरित निकाली काढण्याची मागणी मनपा कंत्राटदार असोसिएशनच्यावतीने करण्यात आली.
By admin | Published: July 4, 2014 10:42 PM2014-07-04T22:42:41+5:302014-07-04T22:42:41+5:30