मिनी रत्न कंपनी इरेडा'च्या शेअर्सची आज बाजारात यशस्वी एन्ट्री झाली. या IPO ला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. एकूण ३८ पट पेक्षा जास्त सबक्राइब झाले आहे. IPO अंतर्गत, ३२ रुपयांच्या किमतीने शेअर्स जारी करण्यात आले. आज तो बीएसईवर ५० रुपयांच्या किमतीत दाखल झाला आहे. म्हणजेच IPO गुंतवणूकदारांना ५६.२५ टक्के लिस्टिंग फायदा झाला. लिस्टिंगनंतर तो शेअर ५९.९९ च्या वरच्या सर्किटवर पोहोचला. IPO गुंतवणूकदार पहिल्या दिवशी ८७ टक्क्यांहून अधिक नफा कमावत आहेत.
MF ची नवी स्कीम, १ डिसेंबरपासून संधी; ५०० रुपयांपासून करता येणार गुंतवणूक
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचा २,१५०.२१ कोटी IPO २१-२३ नोव्हेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. या IPO ला गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. एकूणच हा IPO ३८.८० पट सबस्क्राईब झाला. यामध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा हिस्सा १०४.५७ पट, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा २४.१६ पट, किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा ७.७३ पट आणि कर्मचाऱ्यांचा वाटा ९.८० पट होता.
या IPO अंतर्गत १,२९०.१३ कोटी रुपयांचे नवीन शेअर जारी करण्यात आले आहेत. याशिवाय, ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत १० रुपयांचे दर्शनी मूल्य असलेले २६,८७,७६,४७१ शेअर्स विकले. हे शेअर्स सरकारने विकले आहेत. या विक्रीपूर्वी सरकारचा यात १०० टक्के हिस्सा होता. कंपनी नवीन शेअर्सद्वारे उभारलेल्या पैशाचा वापर भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कर्ज वितरणासाठी भांडवली आधार वाढवण्यासाठी करेल. सप्टेंबर २०२३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, त्याचा CRAR २०.९२ टक्के आहे.
ही ३६ वर्षे जुनी वित्तीय कंपनी IREDA अक्षय ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता प्रकल्पांसाठी कर्ज वितरित करते. हे प्रकल्प नियोजनापासून ते पोस्ट-कमिशनिंगपर्यंत आर्थिक सेवा पुरवते, यामध्ये उपकरणे उत्पादन आणि प्रसारणाचा समावेश आहे. कंपनीचे आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या सहामाहीत तिचे एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १५७७.७५ कोटी रुपयांवरून २३२०.४६ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. या कालावधीत त्याचा निव्वळ नफा ४१०.२७ कोटी रुपयांवरून ५७९.३२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सकल एनपीए ५.०६ टक्क्यांवरून ३.१३ टक्क्यांवर आला आणि निव्वळ एनपीए २.७२ टक्क्यांवरून १.६५ टक्क्यांवर घसरला. तरतुदी कव्हरेज प्रमाण ४८.११ टक्के आहे.