Lokmat Money > बिझनेस न्यूज > कर्जाचा ईएमआय वेळेवर भरला नाही, SBI तुमच्या घरी चॉकलेट पाठवणार; डिफॉल्टरसाठी नवीन योजना

कर्जाचा ईएमआय वेळेवर भरला नाही, SBI तुमच्या घरी चॉकलेट पाठवणार; डिफॉल्टरसाठी नवीन योजना

आता तुम्ही कर्जाचा EMI भरायला विसरलात तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी तुमच्या घरी कधीही चॉकलेट घेऊन येऊ शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 08:50 PM2023-09-17T20:50:55+5:302023-09-17T20:55:38+5:30

आता तुम्ही कर्जाचा EMI भरायला विसरलात तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी तुमच्या घरी कधीही चॉकलेट घेऊन येऊ शकतात.

Loan EMI not paid on time, SBI will send chocolates to your home; New scheme for defaulters | कर्जाचा ईएमआय वेळेवर भरला नाही, SBI तुमच्या घरी चॉकलेट पाठवणार; डिफॉल्टरसाठी नवीन योजना

कर्जाचा ईएमआय वेळेवर भरला नाही, SBI तुमच्या घरी चॉकलेट पाठवणार; डिफॉल्टरसाठी नवीन योजना

तुम्हीही देशातील सर्वात मोठी सरकारी बँकएसबीआयचे  ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल, तर तुमचा कोणताही EMI चुकणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे, अन्यथा बँकेने आता तुमच्यासाठी एक खास योजना तयार केली आहे. एसबीआयची ही योजना अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांच्यावर बँकेला मासिक पेमेंट चुकण्याची शंका आहे. आता त्यांना वेळेवर हप्ते भरता यावेत यासाठी बँकेने नवीन योजना आणली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाची ही योजना अनोखी आहे. यामध्ये जर एखाद्या ग्राहकाला वेळेवर पेमेंट होणार नाही असे बँकेला वाटत असेल तर बँक त्याच्या घरी चॉकलेट पाठवले जाणार आहे. बँकेने दिलेली माहिती अशी, जे ग्राहक ईएमआय भरणार नाही, ते अनेकदा बँकेच्या रिमाइंडर कॉलला प्रतिसाद देत नाही. अशा  ग्राहकांसाठी बँकेने योजना आणली आहे.  बँक आता त्यांना थेट त्यांच्या घरी चॉकलेट देऊन पेमेंट करण्याची आठवण करून देणार आहे.

जेव्हा बँकिंग उद्योगात किरकोळ कर्जात वाढ झाली आहे. किरकोळ कर्जात वाढ झाल्यामुळे, मासिक ईएमआयमध्ये डिफॉल्टची प्रकरणेही वाढली आहेत. अशा परिस्थितीत सर्व बँका ईएमआय आणि परतफेडीसाठी विविध प्रकारच्या मोहिमा राबवत आहेत. SBI ची ही चॉकलेट योजना देखील चांगली पुनर्प्राप्ती सुनिश्चित करण्याचा एक प्रयत्न आहे.

PPF खाते तुम्हाला करोडपती करु शकते! फक्त 'हे' गणित बसवावे लागेल

SBI च्या बाबतीत, जून २०२३ च्या तिमाहीत किरकोळ कर्जे १२,०४,२७९ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहेत. एका वर्षापूर्वी म्हणजेच जून २०२२ च्या तिमाहीत ते १०,३४,१११ कोटी रुपये होते.  तसे पाहिले तर एका वर्षात बँकेच्या किरकोळ कर्जात १६.४६ टक्के वाढ झाली आहे. जून २०२३ मध्ये SBI चे एकूण कर्ज ३३,०३,७३१ कोटी रुपये होते. आता बँकेच्या कर्ज पुस्तकात किरकोळ कर्जाचा वाटा सर्वात जास्त आहे.

Web Title: Loan EMI not paid on time, SBI will send chocolates to your home; New scheme for defaulters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.