Join us  

तीन महिन्यांत १.४० टक्क्यांनी व्याजदर वाढले; कर्जाचा हप्ता पुन्हा वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 6:25 AM

गेल्या तीन महिन्यांतील या तिसऱ्या दरवाढीमुळे एकूण १.४०%नी व्याजदर वाढले असून, ईएमआयमध्ये वाढ होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी महागाई कमी करण्यासाठी अपेक्षेप्रमाणे रेपो दरामध्ये पुन्हा एकदा अर्धा टक्क्यांची वाढ केली आहे. याचा थेट परिणाम म्हणजे, गृहकर्जासह इतर कर्जे महाग होणार आहेत. गेल्या तीन महिन्यांतील या तिसऱ्या दरवाढीमुळे एकूण १.४०%नी व्याजदर वाढले असून, ईएमआयमध्ये वाढ होणार आहे.

ईएमआय किती वाढेल?कर्ज     : ३० लाखकालावधी     : २० वर्षेव्याजदर     : ८.४०%किती रुपयांनी ईएमआय वाढणार :         ९२५ रुपये

दरवाढीचा सामना कसा कराल?अर्थतज्ज्ञ विनोद जैन यांनी सांगितले की...

n ग्राहकाने कर्जाचा कालावधी शक्यतो वाढवून घेऊ नये.n अतिरिक्त पैसा असेल तर कर्ज फेडणे सर्वांत फायदेशीर ठरू शकते.n वर्षाकाठी काही रक्कम निश्चितपणे कर्जात भराn महिन्याचे बजेट पुन्हा एकदा बारकाईने आखा.n अनावश्यक खर्च टाळावा. क्रेडिट कार्डाचा वापर गरजेचा असल्याशिवाय करू नये.

मुदत ठेवींवर ७% व्याज?आता दीर्घकालीन मुदत ठेवींचा दर सात टक्के होण्याची चिन्हे आहेत. ज्यांची पाच वर्षे मुदतीची एक लाख रुपयांची मुदत ठेव आहे त्यांना दरवाढीनंतर व्याजापोटी ३,४३६ रुपये अधिकचे मिळणार आहेत.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्र