अदानी समूहाच्या समभागांच्या घसरणीच्या दरम्यान, प्रवर्तकाने कोलॅटरलच्या रुपात शेअर्सच्या बदल्यात घेतलेल्या 1.11 बिलियन डॉलर्सच्या कर्जाच्या रकमेची प्रीपेमेंट प्रक्रिया सुरू केली आहे. या शेअर्सची मॅच्युरिटी सप्टेंबर 2024 रोजी पूर्ण होत होती. निवेदन जारी करताना, समूहाने सांगितले की, प्रीपेमेंटसाठी, अदानी पोर्ट आणि एसईझेड, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जीमधील शेअर्स तारण ठेवण्यात आले होते. ज्याचे प्रीपेमेंट वेळेपूर्वी केले जात आहे.
अदानी पोर्टमध्ये 168.27 मिलियन शेअर्स, जे प्रवर्तकांचा 12 टक्के हिस्सा आहे, जारी केले जातील. अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 27.56 मिलियन शेअर्स किंवा प्रवर्तकांचे 3 टक्के भागभांडवल जारी केले जातील. अदानी ट्रान्समिशनमध्ये 11.77 मिलियन शेअर्स किंवा प्रवर्तकांचे 1.4 टक्के शेअर्स जारी केले जातील. बॅलन्स शीट आणि कर्ज भरण्याची क्षमता दोन्ही मजबूत असल्याचा विश्वास गुंतवणूकदारांना यावा यासाठी प्रीपेमेंट लोनचे पाऊल उचलण्यात आले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
या घोषणेमुळे अदानी पोर्ट्सच्या शेअर्सना काहीसा दिलासा मिळाला, जो 6 टक्क्यांनी वाढून 528.40 रुपयांवर पोहोचला आणि निफ्टी 50 वर सर्वाधिक वाढला. मात्र, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर आणि अदानी विल्मर या समभागांमध्ये 5 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. अदानी ट्रान्समिशनचा स्टॉकला 10 टक्क्यांचे लोअर सर्किट लागले आहे. तर अदानी ट्रान्समिशनचा शेअर वृत्त लिहिपर्यंत 1,564.90 रुपयांवर व्यवहार करत होता.