Lokmat Money > बिझनेस न्यूज > कर्जे महागली, तीन बँकांनी केली व्याजदरात वाढ

कर्जे महागली, तीन बँकांनी केली व्याजदरात वाढ

सर्वसामान्य होळीच्या उत्साहात असताना कर्जदारांना मात्र त्यांच्या मासिक हप्त्यात वाढ सोसावी लागणार आहे. सर्वात कमी व्याजदर असलेल्या गृह कर्जाचा सर्वसामान्यांचा हप्ता ४०० रुपयांनी (३० लाख रुपयांसाठी) वाढणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 06:16 AM2018-03-02T06:16:27+5:302018-03-02T06:16:27+5:30

सर्वसामान्य होळीच्या उत्साहात असताना कर्जदारांना मात्र त्यांच्या मासिक हप्त्यात वाढ सोसावी लागणार आहे. सर्वात कमी व्याजदर असलेल्या गृह कर्जाचा सर्वसामान्यांचा हप्ता ४०० रुपयांनी (३० लाख रुपयांसाठी) वाढणार आहे.

Loans increased, three banks raised interest rates | कर्जे महागली, तीन बँकांनी केली व्याजदरात वाढ

कर्जे महागली, तीन बँकांनी केली व्याजदरात वाढ

मुंबई : सर्वसामान्य होळीच्या उत्साहात असताना कर्जदारांना मात्र त्यांच्या मासिक हप्त्यात वाढ सोसावी लागणार आहे. सर्वात कमी व्याजदर असलेल्या गृह कर्जाचा सर्वसामान्यांचा हप्ता ४०० रुपयांनी (३० लाख रुपयांसाठी) वाढणार आहे. स्टेट बँक, आयसीआयसीआय व पीएनबी या तीन बँकांनी १ मार्चपासून ही अंमलबजावणी केली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक आॅफ इंडिया व पंजाब नॅशनल बँकेने २८ फेब्रुवारीला मुदत ठेवींवरील व्याजदरात अर्धा टक्क्यांची वाढ केली. ठेवीदारांसाठी ही खूशखबर ठरली. मात्र १ मार्चचा निर्णय कर्जदारांना नाखूश करणारा ठरला. श्रीमंतांसाठी बँक ठेवींवरील व्याजदरात अर्धा टक्का वाढ करते. मग बचत खात्यावरील व्याज दर का वाढविले जात नाही, असा सवाल महाराष्ट्र स्टेट बँक कर्मचारी फेडरेशनचे सरचिटणीस देवीदास तुळजापुरकर यांनी केला.
>असे बदलले दर
स्टेट बँक
आधी आता
८.१५ ८.३५
पीएनबी
आधी आता
८.५० ८.६५
आयसीआयसीआय बँकेच्या कर्जाच्या व्याजदरातही ०.१५ टक्क्यांची वाढ झाली आहे. बदलत्या (फ्लोटिंग) दरावर गृह कर्ज घेतलेल्यांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. यासोबतच वाहनाची कर्जेही महाग झाली आहेत.

Web Title: Loans increased, three banks raised interest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.