नवी दिल्ली : सणासुदीचे दिवस वगळता लाेकांनी यावर्षी जाेरदार खरेदी केली आहे. विशेष म्हणजे, काेणतीही चिंता न करता उधारीवर अर्थात क्रेडिट कार्डचा वापर करण्यावर लाेकांचा कल वाढत आहे. हा वापर एवढा वाढला आहे की क्रेडिट कार्डची थकबाकी प्रथमच २ लाख काेटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, बँकांच्या इतर एकूण कर्जाच्या तुलनेत ही थकबाकी दुप्पट वाढली आहे.
आरबीआयच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये क्रेडिट कार्डची एकूण थकबाकी २ लाख २५८ काेटी रुपये हाेती. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २९.७ टक्के वाढ आहे. क्रेडिट कार्डची थकबाकी वाढली म्हणजे लाेकांवरील कर्जही वाढले. त्यामुळे आरबीआयने चिंतादेखील व्यक्त केली आहे. ही थकबाकी म्हणजे असुरक्षित बँक क्रेडिट श्रेणीमध्ये येते. सणासुदीच्या काळात लाेकांनी क्रेडिट कार्ड वापरुन माेठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे.
बँकांना चिंता नाही
प्रथमच क्रेडिट कार्डची थकबाकी २ लाख काेटींवर गेली आहे. बँका मात्र निश्चिंत आहेत. त्यात क्रेडिट कार्डच्या सरासरी थकबाकीचे प्रमाण कमी आहे, असे बँकांचे म्हणणे आहे.
ग्राहकांकडून वापर वाढला आहे. याचाच अर्थ लाेकांचा आत्मविश्वास वाढत आहे, असे क्रेडिट कार्ड अर्थव्यवस्थेचे तज्ज्ञ संजीव माेघे यांनी सांगितले.
५% पेक्षा कमी लाेकांकडे क्रेडिट कार्ड आहे.
१.४% वाटा क्रेडिट कार्डच्या थकबाकीचा बँकांच्या कर्जवाटपात आहे.
१४.१% गृहकर्ज
३.७% वाहन कर्ज
०.८% ठेवींवरील कर्ज
०.७% शैक्षणिक
०.६% सुवर्ण
भारतातील प्रमाण नगण्य
n लोकसंख्येच्या तुलनेत ८.५ कोटी (४.६९%) लोकांकडे क्रेडिट कार्ड आहे.
n गतवर्षी हे प्रमाण ७.५ कोटी होते. परंतु त्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांचे प्रमाण २०%नी वाढले आहे.
किती टक्के लोकांकडे आहेत क्रेडिट कार्ड?
n कोणत्याही अडीअडचणीला पैशाची गरज भागवण्यासाठी अनेकजण क्रेडिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्डद्वारे महिन्याला ठरावीक मर्यादेत खर्च करण्याची सुविधा मिळते.
n अवास्तव खर्च होत असल्याने आणि महिन्याअखेरीस परतफेड करावी लागत असल्याने अनेकजण क्रेडिट कार्ड वापरत नाहीत. त्यानुसार देशनिहाय किती टक्के लोकांकडे क्रेडिट कार्ड आहे, त्याचा आढावा घेऊया...
क्रेडिट कार्डधारक टॉप १० देश
कॅनडा ८२.७४%
इस्रायल ७९.०५%
आईसलंड ७४.००%
हाॅंगकाॅंग ७१.६३%
जपान ६९.६६%
स्वित्झर्लंड ६९.२१%
द.कोरिया ६८.४४%
नॉर्वे ६६.७४%
अमेरिका ६६.७%
फिनलंड ६५.२९%