Join us  

व्हॉट्सॲपचे चॅट आता करा लॉक! ज्याला पासवर्ड ठाऊक, तोच वाचू शकेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 2:36 PM

या फिचरनंतर, फक्त तुम्हीच तुमच्या चॅट्समध्ये प्रवेश करू शकाल. यासाठी तुम्हाला डिव्हाईस पिन किंवा बायोमेट्रिक्स लॉक वापरावे लागेल.

नवी दिल्ली - जगभरात संदेश पाठविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सॲपने आणखी एक भन्नाट फिचर आणले आहे. याद्वारे तुम्ही कोणताही ग्रुप किंवा वैयक्तिक चॅट लॉक करू शकता. या फिचरनंतर, फक्त तुम्हीच तुमच्या चॅट्समध्ये प्रवेश करू शकाल. यासाठी तुम्हाला डिव्हाईस पिन किंवा बायोमेट्रिक्स लॉक वापरावे लागेल.

वेगळा पासवर्ड ठेवता येणार- सध्या या फिचरमध्ये मोबाइल फोनची स्क्रीन लॉक करण्यासाठी जो पासवर्ड वापरला जातो, तोच वापरला जात आहे. - मात्र यामुळे जर कोणाला मोबाइल पासवर्ड माहीत असेल तर ते तुमच्या लॉक केलेल्या चॅट्समध्ये प्रवेश करू शकतो. - येत्या काही दिवसांत कंपनी यूजर्सला या फिचरमध्ये स्वत: पासवर्ड सेट करण्याचा पर्याय देण्याच्या तयारीत आहे.

चॅट लॉक फिचर कसे वापरायचे? - या फिचरसाठी व्हॉट्सॲपला लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट करा.- यानंतर व्हॉट्सॲप ओपन करा.- आता तुम्हाला जे चॅट लपवायचे आहे आणि ज्याला लॉक आणि हाइड करायचे आहे त्यावर जा - त्या चॅटच्या अकाउंटच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा.- आता डिसॲपियरिंग मेसेजच्या खाली लिहिलेले नवीन चॅट लॉक फिचर लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करा, त्यानंतर चॅट लॉक होईल.- याचप्रमाणे तुम्ही इतर चॅट देखील लॉक व लपवू शकता.

लॉक केलेली चॅट्स कशी उघडायची? - व्हॉट्सॲप ओपन करा- आता ॲपच्या होम पेजमध्ये जे चॅट आहेत, त्याला खाली खाली स्क्रोल करा.- यानंतर एक सिक्रेट फोल्डर दिसेल, त्याला लॉक्ड चॅट असे नाव असेल. त्यावर टॅप करा.- आता पासवर्ड टाका किंवा फिंगरप्रिंट करा. ते केल्यानंतर चॅटमध्ये प्रवेश करू शकाल.

मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे या फिचरची माहिती दिली. त्यांनी सांगितले की व्हॉट्सॲपमधील नवीन लॉक फीचर तुमचे चॅट अधिक सुरक्षित करेल. चॅट एक पासवर्ड असलेल्या फोल्डरमध्ये असतील. यामुळे, चॅटचा मजकूर दिसणार नाही.

टॅग्स :व्हॉट्सअ‍ॅपतंत्रज्ञानव्यवसायसोशल मीडिया