नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधितांचा आकडा २ लाखांच्या वर पोहचला आहे. गेल्या २ महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे कामकाज ठप्प पडल्याने अनेक कंपन्या डबघाईला आल्या आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढणार असून कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
पण कोरोनाच्या अशा संघर्ष स्थितीत काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या फक्त नोकऱ्या टिकवत नाही तर त्यांना घसघशीत पगारवाढही देत असल्याचं दिसून येतं. फ्रान्समधील ऑटोमोबाइल कंपनी रॅनो इंडिया हीदेखील अशीच एक कंपनी आहे. या कंपनीने कोरोना काळात आपल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा दिला आहे. कंपनीने तब्बल २५० कर्मचाऱ्यांच्या पगारात १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. २०१९ मध्ये कंपनीला झालेल्या नफ्यामुळे हा निर्णय कंपनीने घेतला आहे.
लॉकडाऊन काळात झालेल्या विक्रीत घट त्यामुळे कंपनीला आर्थिक नुकसान सहन करावं लागलं, पण कंपनीने त्याची झळ कर्मचाऱ्यांना बसू दिली नाही. रॅनो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ३० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना प्रमोशनही दिलं आहे, जे ऑगस्टपासून लागू होईल. ट्राइवर एमपीवीच्या यशानंतर कंपनीचा उत्साह वाढला आहे. आगामी फेस्टिव सीजनमध्ये त्यांची छोटी एसयूवी विक्री वाढण्याची कंपनीला आशा आहे. कंपनीची ही प्रगती कायम राहावी यासाठी कर्मचाऱ्यांचा जोश वाढवण्यावर कंपनीचा भर आहे.
२०२०-२१ मध्ये कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. विशेष म्हणजे मागील आर्थिक वर्षात कंपनीला फक्त १०-१२ टक्के नफा झाला आहे. वेतनात वाढ फक्त आरआयपीएल कर्मचाऱ्यांच्या होणार आहे. यामध्ये अलायंस प्लांट निसान तथा आरएडडी ऑर्गनायझेशन रॅनो निसान टेक्नॉलजी बिझनेस सेंटर इंडियाचा समावेश नाही.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोरोनाग्रस्ताला घरी पाहून कुटुंबाला आनंद; पण मध्यरात्री पोलीस आले अन् रुग्णाला घेऊन गेले, कारण...
लय भारी! घरी जाण्यासाठी श्रमिक ट्रेनचं तिकीट न मिळाल्याने ‘या’ पठ्ठ्याने काय केलं पाहा?
चार राज्यांत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार
बॉम्बे हायकोर्टचे नामांतर महाराष्ट्र हायकोर्ट करा
मुंबई विमानतळावर विमान धावपट्टीवरून घसरले