Stock Market Live on Result Day: आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यादरम्यान चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराचं कामकाज सुरू घसरणीसह सुरू झालं. सुरुवातीच्या कलांनंतर शेअर बाजारात जोरदार आपटल्याचं दिसून आलं. कामकाजादरम्यान सेन्सेक्स ४००० अकांच्या, तर निफ्टी ११८७ अंकांनी आपटला.
कामकाजादरम्यान अवघ्या २० मिनिटांत गुंतवणूकदारांचे २० लाख कोटी स्वाहा झाले. तर दुसरीकडे सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. बँकेच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं. यानंतर शेअर ८१५.२५ रुपयांवर आला. तर एनटीपीसीच्या शेअरमध्ये १० टक्क्यांपर्यंत घसरण झाली, तर पॉवर ग्रिडमध्ये ९.८३ आणि इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये ९.१९ टक्क्यांची घसरण झाली.
अदानी समूहाला सर्वाधिक फटका
अदानी समूहातील सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. अदानी पोर्ट्सचे शेअर्स ९ टक्के, अदानी पॉवरचे १० टक्के, अंबुजा सिमेंटचे १० टक्के, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स १० टक्क्यांनी घसरले आहेत. एलआयसीमध्ये १० टक्के, एचएएलमध्ये १० टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे. रिलायन्समध्ये ४.५ टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)