Lokmat Money > बिझनेस न्यूज > मतदान संपताच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार?

मतदान संपताच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार?

2 महिन्यात झालेलं नुकसान भरुन काढण्याचा कंपन्यांचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 04:01 PM2019-05-20T16:01:31+5:302019-05-20T16:03:46+5:30

2 महिन्यात झालेलं नुकसान भरुन काढण्याचा कंपन्यांचा प्रयत्न

Lok Sabha polls end petrol diesel prices start rising | मतदान संपताच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार?

मतदान संपताच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातलं मतदान संपताच पेट्रोल, डिझेलचे दर भडकण्याची शक्यता आहे. मुंबईत आज पेट्रोलच्या दरात 9 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलचा दर लीटरमागे 16 पैशांनी वधारला. देशाच्या राजधानीतही इंधन दर वाढले आहेत. गेले दोन महिने इंधनाच्या दरात फारशी वाढ झाली नव्हती. गेल्या 15 दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर घरसत होते. मात्र काल शेवटच्या टप्प्यातलं मतदान संपताच आज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली. 

पेट्रोल, डिझेल दरात झालेली वाढ नियमित स्वरुपाची असून त्यात काहीच चुकीचं नसल्याचं सरकारी इंधन कंपन्यांनी सांगितलं. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या काळात सरकारनं कंपन्यांना इंधन दर स्थिर ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. गेल्या काही दिवसात इंधन कंपन्यांनी फारशी वाढ केलेली नव्हती. या काळात झालेलं नुकसान आता भरुन काढण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात इंधनाचे दर भडकतील, अशी दाट शक्यता आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. 



जागतिक इंधन बाजारातील स्थिती सध्या फारशी चांगली नाही. अरब राष्ट्रांमधील तणाव, इराण, व्हेनेझुएलामधून कमी झालेला तेल पुरवठा यामुळे इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात देशात पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका उडू शकतो. सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च-एप्रिल महिन्यात इंधन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रती लीटरमागे 5 रुपये, तर डिझेल दरात प्रती लीटरमागे 3 रुपयांची सवलत दिली होती. या सवलतीमुळे झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी इंधन कंपन्यांकडून दर वाढ केली जाण्याची दाट शक्यता आहे. 



सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा दर प्रती बॅरलमागे 70 डॉलरहून अधिक आहे. गेल्या ऑगस्टमध्ये खनिज तेलाचा दर इतका असताना भारतात पेट्रोलचा दर 78 रुपयांच्या, तर डिझेलचा दर 70 रुपयांच्या आसपास होते. मात्र सध्याच्या घडीला भारतात पेट्रोल 73, तर डिझेल 67 रुपयांनी विकलं जात आहे. त्यामुळे इंधन कंपन्यांना नुकसान सोसावं लागत आहे. मतदानाचे सातही टप्पे पूर्ण झाल्यानं आता लवकरच इंधन दरवाढीची झळ बसण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Lok Sabha polls end petrol diesel prices start rising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.