Lokmat Money > बिझनेस न्यूज > लोकमत आणि ॲमेझॉन आयोजित वेबिनार : तुमच्या छोट्या व्यवसायाला कशी उपलब्ध कराल जागतिक बाजारपेठ

लोकमत आणि ॲमेझॉन आयोजित वेबिनार : तुमच्या छोट्या व्यवसायाला कशी उपलब्ध कराल जागतिक बाजारपेठ

Lokmat & Amazon Webinar News : लोकमत आणि ॲमेझॉन यांच्या वतीने टेकिंग लोकल ग्लोबल एक्सिलरेट युअर एक्सपोर्ट्स बिझनेस विथ ई-कॉमर्स हा विशेष वेबिनार शनिवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 12:34 PM2020-11-06T12:34:43+5:302020-11-06T12:35:31+5:30

Lokmat & Amazon Webinar News : लोकमत आणि ॲमेझॉन यांच्या वतीने टेकिंग लोकल ग्लोबल एक्सिलरेट युअर एक्सपोर्ट्स बिझनेस विथ ई-कॉमर्स हा विशेष वेबिनार शनिवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आला आहे.

Lokmat & Amazon Webinar: How to Make Your Small Business a Global Marketplace | लोकमत आणि ॲमेझॉन आयोजित वेबिनार : तुमच्या छोट्या व्यवसायाला कशी उपलब्ध कराल जागतिक बाजारपेठ

लोकमत आणि ॲमेझॉन आयोजित वेबिनार : तुमच्या छोट्या व्यवसायाला कशी उपलब्ध कराल जागतिक बाजारपेठ

औरंगाबाद : आता आपले उत्पादन ॲमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीद्वारे देशातच नाही तर संपूर्ण जगभरात पोहोचविता येते. यासाठीची अधिक माहिती देण्यासाठी लोकमत आणि ॲमेझॉन यांच्या वतीने टेकिंग लोकल ग्लोबल एक्सिलरेट युअर एक्सपोर्ट्स बिझनेस विथ ई-कॉमर्स हा विशेष वेबिनार शनिवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आला आहे. आज प्रत्येक व्यक्ती अतिशय व्यस्ततेतून जात आहे. कोणाकडेही सर्व काही सहजतेने करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध नाही. टेक्नोलॉजीच्या या युगात एक क्षणही वाया घालविण्याची अनेकांची तयारी नसते. यामुळे ॲमेझॉनने प्रत्येक व्यक्तीला अनेक सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. ऑनलाईन खरेदीमध्ये अनेक वस्तूंची खरेदी करता येते. ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठी विश्वसनीय ई-कॉमर्स कंपनी आहे.

ॲमेझॉनद्वारे मिळणाऱ्या वस्तूंची सेवा आणि दर्जा हा उच्चतम प्रतीचा असतो. ॲमेझॉन हे लघु उद्योग व घरगुती बनणाऱ्या अनेक वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देते. यामध्ये गृहोपयोगी वस्तू, सजावटीच्या वस्तू, आरोग्योपयोगी प्रसाधने, चामड्याच्या वस्तू, खेळणी, कपडे, दागिने या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. तसेच स्वच्छता आणि वैयक्तिक काळजीसाठी लागणारी उत्पादने सेंद्रिय आहार इत्यादी वस्तूंची विक्रीही होत आहे. आपल्या उत्पादनाचा ग्राहक कोण असावा, हेसुद्धा आपल्याला ॲमेझॉनद्वारे उपलब्ध होते.

विक्रेत्यांना भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये उत्पादनाची विक्री यशस्वी होण्यासाठी साधने आणि सेवादेखील ॲमेझॉन ई-कॉमर्स कंपनी उपलब्ध करून देते. आजपर्यंत जे काही भारतीय व्यावसायिक ॲमेझॉनच्या माध्यमातून विक्री करतात, त्यांचे कित्येक ब्रॅण्ड्स आज जगभरातील ग्राहकांच्या आवडीचे झाले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये निर्यात मोठी भूमिका बजावते आणि ई-कॉमर्स निर्यात भारतीय एमएसएमईंना जगभरात आपला व्यवसाय उभा करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी सोपा आणि वेगवान मार्ग प्रदान करतो. या खास वेबिनारमध्ये सहभागी व्हा आणि जाणून घ्या जगभरात आपला व्यवसाय उभा करण्यासाठी आणि तो वाढविण्यासाठी एक सोपा आणि वेगवान मार्ग.

 
व्यवसाय वृद्धीसाठी सखोल मार्गदर्शन
- विशेष अतिथी माननीय सुभाष देसाई, उद्योगमंत्री, महाराष्ट्र सहकार.
प्रमुख वक्ते
- अभिजित काम्रा, डायरेक्टर, ग्लोबल ट्रेड ॲमेझॉन इंडिया
- विनोद कुमार, प्रेसिडेंट, इंडिया ग्लोबल एसएमई फोरम
- मुदिता तोडी अजमेरा, को- फाउंडर, जॅकइनदबॉक्स टॉईज
- दीपक मेहरोत्रा, फाउंडर, एन. एम. के. टेक्सटाईल मिल्स

-टेकिंग लोकल ग्लोबल एक्सिलरेट युअर एक्सपोर्ट्स बिझनेस विथ ई कॉमर्स हा विशेष वेबिनार शनिवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. होत आहे.

-http://live.goliveonweb.com/takinglocalglobal/register.php या लिंकचा वापर करून आजच आपली नावनोंदणी करा.

Web Title: Lokmat & Amazon Webinar: How to Make Your Small Business a Global Marketplace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.