अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या वर्षात देशानं कोरोनाचं संकट अनुभवलं. कोरोनाचा सामना करण्यासाठी कराव्या लागलेल्या लॉकडाऊनचा थेट फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला. एका बाजूला महसूल घटला असताना दुसऱ्या बाजूला आरोग्य सुविधांवर मोठा खर्च करावा लागला. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सीतारामन यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर असेल. त्यामुळे सीतारामन कसा दिलासा देणार याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम जवळपास सगळ्याच उद्योग क्षेत्रांमध्ये पाहायला मिळाला. देशातील लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. तर काहींना पगार कपात सहन करावी लागली. त्यामुळे कोरोना संकटाची झळ देशातील कोट्यवधी जनतेच्या खिशाला बसली. सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातून देशवासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा जाणून घेण्यासाठी लोकमतकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे.
>> Lokmat Survey मध्ये सहभागी होण्यासाठी क्लिक करा! <<
--------------------------------------------------------------------------