Lokmat Money > बिझनेस न्यूज > Loksabha Election 2024 Result : ४०० पारचं 'स्वप्न' स्वप्नच राहिलं! शेअर बाजार आपटला, मोठे शेअर्स तोंडघशी

Loksabha Election 2024 Result : ४०० पारचं 'स्वप्न' स्वप्नच राहिलं! शेअर बाजार आपटला, मोठे शेअर्स तोंडघशी

Loksabha Election 2024 Result Share Market : लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपच्या एनडीए आघाडीला 'एक्झिट पोल'च्या तुलनेत फारच कमी जागा मिळत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. याचा मोठा परिणाम शेअर बाजारावर दिसून येतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 03:02 PM2024-06-04T15:02:08+5:302024-06-04T15:04:34+5:30

Loksabha Election 2024 Result Share Market : लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपच्या एनडीए आघाडीला 'एक्झिट पोल'च्या तुलनेत फारच कमी जागा मिळत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. याचा मोठा परिणाम शेअर बाजारावर दिसून येतोय.

Loksabha Election 2024 Result bjp nda may not go beyond 400 The stock market crashed big stocks fell adani huge impact | Loksabha Election 2024 Result : ४०० पारचं 'स्वप्न' स्वप्नच राहिलं! शेअर बाजार आपटला, मोठे शेअर्स तोंडघशी

Loksabha Election 2024 Result : ४०० पारचं 'स्वप्न' स्वप्नच राहिलं! शेअर बाजार आपटला, मोठे शेअर्स तोंडघशी

Loksabha Election 2024 Result Share Market : लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपच्या एनडीए आघाडीला 'एक्झिट पोल'च्या तुलनेत फारच कमी जागा मिळत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. भाजप आघाडीला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठे चढउतार दिसून आले. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. याशिवाय अदानी समूहासह अनेक खासगी कंपन्यांचे शेअर्सही कोसळले.
 

निफ्टी पीएसयू बँक
 

निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक ८३९.५५ अंकांनी म्हणजेच १०.४९ टक्क्यांनी घसरून ७,१६६.६० वर आला. एनएसईवर पंजाब अँड सिंध बँकेचा शेअर १४.७५ टक्क्यांनी घसरून ५५.५० रुपयांवर आला. इंडियन बँक ५२८.७५ रुपयांवर तर युनियन बँक किरकोळ घसरणीसह १४८.९० रुपयांवर व्यवहार करत होती. स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर ११.७३ टक्क्यांनी घसरून ७९९.४५ रुपयांवर आला. पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदाचे समभाग प्रत्येकी १० टक्क्यांनी घसरून अनुक्रमे १२३.३० रुपये आणि २६७.२५ रुपयांवर आले. निफ्टी बँक निर्देशांक २,८०६.४० अंकांनी घसरून ४८,१७३.५५ वर आला.
 

पीएसई इंडेक्स
 

निफ्टी पीएसई निर्देशांक १,२२१.५५ अंकांनी म्हणजेच १०.७८ टक्क्यांनी घसरून १०,११०.२५ वर व्यवहार करत होता. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), पीएफसी, आरईसीएल आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्सचे शेअर्स १५ टक्क्यांपर्यंत घसरले. एनएसईवर हिंदुस्थान एरोनॉटिक्स, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ओएनजीसी, कोल इंडिया, एनटीपीसी, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया, सेल आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स प्रत्येकी १० टक्क्यांनी घसरले.
 

अदानी समूहाच्या कंपन्या
 

बीएसईवर अदानी पोर्ट्सचे शेअर्स २० टक्के, अदानी एनर्जी सोल्यूशन्सचे १९.८० टक्के, अदानी पॉवरचे १९.७६ टक्के, अंबुजा सिमेंटचे १९.२० टक्के आणि समूहातील प्रमुख अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स १९.१३ टक्क्यांनी घसरले. अदानी टोटल गॅसचे शेअर्स १८.५५ टक्के, अदानी ग्रीन एनर्जीचे १८.३१ टक्के, एनडीटीव्हीचे १५.६५ टक्के, एसीसीचे १४.४९ टक्के, अदानी विल्मरचे शेअर ९.८१ टक्क्यांनी घसरले.
 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Loksabha Election 2024 Result bjp nda may not go beyond 400 The stock market crashed big stocks fell adani huge impact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.