Lokmat Money > बिझनेस न्यूज > Loksabha Election 2024 Sensex : निकालांदरम्यान शेअर बाजार जोरदार आपटला; सेन्सेक्स २००० अंकांनी, निफ्टी ७६६ अंकांनी घसरला

Loksabha Election 2024 Sensex : निकालांदरम्यान शेअर बाजार जोरदार आपटला; सेन्सेक्स २००० अंकांनी, निफ्टी ७६६ अंकांनी घसरला

Loksabha Election 2024 Sensex : आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यादरम्यान चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराचं कामकाज मोठ्या सुरू घसरणीसह सुरू झालं.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 09:41 AM2024-06-04T09:41:38+5:302024-06-04T09:41:52+5:30

Loksabha Election 2024 Sensex : आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यादरम्यान चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराचं कामकाज मोठ्या सुरू घसरणीसह सुरू झालं.

Loksabha Election 2024 Sensex Stock market tumbles amid results Sensex fell by 2000 points Nifty by 766 points | Loksabha Election 2024 Sensex : निकालांदरम्यान शेअर बाजार जोरदार आपटला; सेन्सेक्स २००० अंकांनी, निफ्टी ७६६ अंकांनी घसरला

Loksabha Election 2024 Sensex : निकालांदरम्यान शेअर बाजार जोरदार आपटला; सेन्सेक्स २००० अंकांनी, निफ्टी ७६६ अंकांनी घसरला

Loksabha Election 2024 Sensex : आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यादरम्यान चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराचं कामकाज सुरू घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स १६४० अंकांनी घसरून ७४८५४ अंकांवर तर निफ्टी १५५ अंकांनी घसरून २३१२० अंकांवर उघडला. यानंतर शेअर बाजारात आणखी घसरण होऊन सेन्सेक्स २००० पेक्षा तर निफ्टी ७५० अंकांनी घसरला. 
 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक रेड झोनमध्ये कार्यरत होते. सन फार्मा, ब्रिटानिया, नेस्ले, एचयूएल, सिप्ला, एशियन पेंट्स आणि डॉक्टर रेड्डीज या कंपन्यांच्या शेअरमध्ये जोरदार वाढ दिसून आली, तर अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्ट्स, एसबीआय, ओएनजीसी, लार्सन, पॉवर ग्रिड आणि एनटीपीसीचे शेअर्स घसरले.
 

प्री ओपनमध्ये स्थिती काय?
 

मंगळवारी लोकसभा निवडणुकांचे निकाल असल्यानं शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसून येऊ शकतात, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं. प्री ओपनमध्ये बीएसई सेन्सेक्स ६८१ अंकांच्या तेजीसह ७७१५० तर निफ्टी ३३९ अंकांच्या तेजीसह २३६०३ वर ट्रेड करत होता. आशियाई शेअर बाजारही सामान्य नोटवर कामकाज करत होता.
 

दिग्गज शेअर्सची स्थिती
 

मंगळवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात गौतम अदानी समूहाच्या सर्व १० लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. अदानी एंटरप्रायझेस ६.३९ टक्के, तर एसीसी लिमिटेडचे समभाग ४ टक्क्यांच्या घसरणीवर व्यवहार करत होते. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना बंपर परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या समभागांबाबत बोलायचं झालं तर आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, टीसीएस, एचसीएल, इन्फोसिस, विप्रो, कोटक महिंद्रा, इंजिनिअर्स इंडिया, एचडीएफसी, प्राज इंडस्ट्रीज, अशोक लेलँड, फिनोलेक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, लार्सन, ओएनजीसी आणि इरकॉन इंटरनॅशनल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

Web Title: Loksabha Election 2024 Sensex Stock market tumbles amid results Sensex fell by 2000 points Nifty by 766 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.