Lokmat Money > बिझनेस न्यूज > निवडणुकीपूर्वी पेट्रोल, डिझेलबाबत मोठी घोषणा; 'या' राज्यात पेट्रोल ७५ रुपये लिटर होणार

निवडणुकीपूर्वी पेट्रोल, डिझेलबाबत मोठी घोषणा; 'या' राज्यात पेट्रोल ७५ रुपये लिटर होणार

गेल्या काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात दोन रुपयांनी घट केली. २०२२ नंतर पहिल्यांदाच हे पेट्रोलचे दर कमी केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 04:54 PM2024-03-20T16:54:15+5:302024-03-20T16:59:34+5:30

गेल्या काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात दोन रुपयांनी घट केली. २०२२ नंतर पहिल्यांदाच हे पेट्रोलचे दर कमी केले.

loksabha election Big announcement about petrol, diesel before elections Petrol will be Rs 75 per liter in this state | निवडणुकीपूर्वी पेट्रोल, डिझेलबाबत मोठी घोषणा; 'या' राज्यात पेट्रोल ७५ रुपये लिटर होणार

निवडणुकीपूर्वी पेट्रोल, डिझेलबाबत मोठी घोषणा; 'या' राज्यात पेट्रोल ७५ रुपये लिटर होणार

निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोलचे दोन रुपयांनी कमी केले. देशातभरात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना दक्षिण भारत दौरा सुरू केला आहे. दुसरीकडे, आज तामिळनाडू येथील डीएमके पक्षाने आज लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून यावेळी घोषणापत्रही जाहीर केले आहे. 

Gold Price Today: सोन्याची किंमत 'ऑल टाईम हाय'वर, आता ६६ हजारांच्या जवळ पोहोचला भाव

डीएमकेने आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत मोठी घोषणा केली आहे. जर आमच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या तर तामिळनाडूमध्ये पेट्रोल ७५ रुपये तर डिझेल ६५ रुपये लिटरने करु अशी घोषणा केली आहे.  राज्यातील लोकसभेचा निकाल डीएमकेच्या बाजूने लागल्यास पेट्रोलचे दर प्रतिलिटर २५ रुपयांहून अधिक स्वस्त होतील. डिझेलच्या दरात २७ रुपयांपेक्षा जास्त कपात करु असं यात म्हटले आहे. तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईमध्ये सध्या पेट्रोलचा दर १००.७५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९२.३४ रुपये प्रति लिटर आहे.

मोदी सरकारने दरात केली घट 

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने देशातील सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी कपात करण्यात आली असून, नवीन किमती १५ मार्च २०२४ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून लागू झाले आहेत.

लक्षद्वीपमध्येही दर कपात

काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने लक्षद्वीप बेटावर, अँड्रोट आणि कल्पेनी बेटांसाठी पेट्रोल आणि डिझेलची किंमत प्रति लिटर १५.३ रुपये आणि कावरत्ती आणि मिनिकॉयसाठी ५.२ रुपये प्रति लिटरने कमी झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील ही कपात १६ मार्चपासून लागू झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात कपात केल्यानंतर आता लक्षद्वीपच्या सर्व बेटांवर पेट्रोलचे दर १००.७५ रुपये/लिटर आणि डिझेलचे दर ९५.७१ रुपये/लिटर झाले आहेत. केंद्र सरकारने काल संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांनी कपात केली होती. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: loksabha election Big announcement about petrol, diesel before elections Petrol will be Rs 75 per liter in this state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.