Lokmat Money > बिझनेस न्यूज > निवडणूक इफेक्ट : सेन्सेक्स वाढण्याचा अन् रुपया घसरण्याचा अंदाज

निवडणूक इफेक्ट : सेन्सेक्स वाढण्याचा अन् रुपया घसरण्याचा अंदाज

अमेरिकेने नुकताच भारताला व्यापार संधीतून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढील दोन महिन्यांत एकप्रकारचे व्यापारयुद्ध भडकण्याची चिन्हे आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 08:56 AM2019-03-08T08:56:58+5:302019-03-08T08:59:01+5:30

अमेरिकेने नुकताच भारताला व्यापार संधीतून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढील दोन महिन्यांत एकप्रकारचे व्यापारयुद्ध भडकण्याची चिन्हे आहेत.

Loksabha Election Effect: sensex may hit 42000 And dark days ahead for rupee | निवडणूक इफेक्ट : सेन्सेक्स वाढण्याचा अन् रुपया घसरण्याचा अंदाज

निवडणूक इफेक्ट : सेन्सेक्स वाढण्याचा अन् रुपया घसरण्याचा अंदाज

मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीतील अनिश्चिततेमुळे आणि भारत-अमेरिकेतील संभाव्य ट्रेड वॉरमुळे भारताचा शेअर बाजार नवीन उंचीवर जाण्याची शक्यता आहे. याला पाकिस्तानसोबतच्या तणावाचीही किनार असणार आहे. मात्र, याचा उलटा परिणाम रुपयावर होणार असून अवमुल्यन होण्याची भीती अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 


ग्लोबल ब्रोकरेज मॉर्गन स्टॅनली या संस्थेने भारतीय शेअर बाजार 42000 पर्यंत उसळी घेणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. तर रॉयटर्सने केलेल्या अभ्यासामध्ये रुपया कोसळणार असल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 2019 मध्ये रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 1 टक्क्याने घसरली आहे. मात्र, गेल्या 12 महिन्यांपेक्षा जास्त रुपया घसरणार नसल्याचे या अर्थतज्ज्ञांचे मत आहे. 


अमेरिकेने नुकताच भारताला व्यापार संधीतून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढील दोन महिन्यांत एकप्रकारचे व्यापारयुद्ध भडकण्याची चिन्हे आहेत. 29 ऑगस्ट 2018 मध्ये सेन्सेक्सने 38,989.65 टप्पा गाठला होता. यानंतर सेन्सेक्स 6 टक्क्यांनी घसरला आहे. 


भारताची लेहमन ब्रदर्स म्हणून ओळखली जाणारी आयएल अँड एफएसच्या दिवाळखोरीमुळे बाजाराला मोठा झटका बसला होता. यामुळे शेअर्सची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली आणि सेन्सेक्स 35 हजारांच्या खाली आला आहे. या वर्षी भारतातील खराब प्रदर्शनाचे कारण तेलाच्या वाढत्या किंमती आणि राजकीय अनिश्चितता असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, पाया मजबूत असल्याने सेन्सेक्स वाढण्याचे मोठे संकेत मिळत आहेत. शेतकऱ्यांसाठी मदत, भारताने केलेली सैन्य कारवाई, युती-आघाडी यामुळे स्वबळावर सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. 


तर या उलट आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे अवमुल्यन सुरुच राहणार आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे अमेरिकेने भारताचा व्यापार संधीचा काढून घेतलेला दर्जा आहे. तसेच भाजपाला बहुमत न मिळाल्यास रुपया पुन्हा 74 पार जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. आयएनजीचे आशियाई अर्थतज्ज्ञ प्रकाश सकपाळ यांनी सांगितले की, रुपयामध्ये पुन्हा घसरण सुरु झाली आहे. जेव्हा पर्यंत राजकीय संकट टळत नाही तोपर्यंत ही घसरण सुरुच राहणार आहे.

Web Title: Loksabha Election Effect: sensex may hit 42000 And dark days ahead for rupee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.