Lokmat Money > बिझनेस न्यूज > लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास महागणार; पुनर्विकास केलेल्या स्थानकांवर आकारणार विकास शुल्क

लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास महागणार; पुनर्विकास केलेल्या स्थानकांवर आकारणार विकास शुल्क

रेल्वे मंडळानेही याबाबत एक पत्र जारी केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे शुल्क तीन श्रेणींमध्ये विभागण्यात येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 08:24 AM2022-01-09T08:24:28+5:302022-01-09T08:26:16+5:30

रेल्वे मंडळानेही याबाबत एक पत्र जारी केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे शुल्क तीन श्रेणींमध्ये विभागण्यात येईल.

Long-distance rail travel will be expensive; Development charges will be levied on redeveloped stations | लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास महागणार; पुनर्विकास केलेल्या स्थानकांवर आकारणार विकास शुल्क

लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास महागणार; पुनर्विकास केलेल्या स्थानकांवर आकारणार विकास शुल्क

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास महागण्याची शक्यता आहे. पुनर्विकासित रेल्वेस्थानकांवरून रेल्वेगाड्यांमध्ये चढणे किंवा उतरण्यावर विकास शुल्क आकारण्याचा विचार रेल्वे मंत्रालयाकडून सुरू आहे. 

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील रानी कमलापती आणि गांधीनगर रेल्वेस्थानकाचा विकास करण्यात आला. अशा प्रकारे आणखी काही स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. या स्थानकांवरून तिकीट बुकिंग करतानाच प्रवासभाड्यात या शुल्काचा समावेश केला जाऊ शकताे. 

रेल्वे मंडळानेही याबाबत एक पत्र जारी केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे शुल्क तीन श्रेणींमध्ये विभागण्यात येईल. सर्व एसी क्लासेससाठी ५० रुपये, स्लीपर क्लाससाठी २५ रुपये तर अनारक्षित आणि द्वितिय श्रेणीसाठी १० रुपये शुल्क राहील. यातून उपनगरीय रेल्वे प्रवास वगळण्यात येणार आहे. त्यानुसार पुनर्विकासित स्थानकांवर प्लॅटफाॅर्म तिकीटही १० रुपयांनी महाग असेल.  

रेल्वेचा महसूल वाढेल
स्थानक विकास शुल्क आकारल्यामुळे रेल्वेचा महसूलही वाढेल. तसेच हे माॅडेल रेल्वेसाठी आर्थिकदृष्ट्या व्यवहार्यही राहील. तसे झाल्यास खासगी क्षेत्र याकडे आकर्षिक हाेईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Long-distance rail travel will be expensive; Development charges will be levied on redeveloped stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.