नवी दिल्ली : प्रादेशिक पातळीवर मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या स्थानिक शीतपेयांचा अभ्यास करण्यासाठी कोका-कोला आणि पेप्सीको या बहुराष्ट्रीय शीतपेय कंपन्यांनी प्रथमच विशेष पथकांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक शीतपेये व्यवसायास धोका निर्माण झाल्याने कंपन्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते.
ग्रामीण भागात विकल्या जाणाऱ्या तसेच बनावट शीतपेयांचा अभ्यास करण्यासाठी या कंपन्यांनी याआधीच पथके नेमली आहेत. आता नेमण्यात येत असलेली पथके आधीच्या पथकांपेक्षा वेगळी आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पेप्सीकोने अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. कोका-कोलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला स्पर्धेची जाणीव आहे. पण केवळ स्पर्धेवर लक्ष ठेवून आहोत, असे नव्हे. नव्या उत्पादनांची आम्ही माहिती ठेवतो. मोठ्या शहरांत लोकप्रिय असलेल्या किमान ५0 स्थानिक ब्रँडची शीतपेये आहेत. ही उत्पादने कुठल्याही प्रकारच्या मार्केटिंगशिवाय विकली जातात. यातील बरेचसे उत्पादक आपला माल थेट किरकोळ विक्रेत्यांना देतात. (वाणिज्य प्रतिनिधी)
तामिळनाडूत बोव्होंटो, दिल्लीत जयंती कोला, गुजरातेत हजुरी अॅण्ड सन्सचा सोस्यो, गिनलीम आणि लेमी, दिल्लीत राहुल बेवरेजेसचा सिटी कोला ही काही लोकप्रिय स्थानिक शीतपेयांची नावे आहेत. शीतपेय बाजारपेठेत त्यांचा हिस्सा १५ ते १७ टक्के आहे. संघटित शीतपेय कंपन्यांची एकूण बाजारपेठ सुमारे १४ हजार कोटींची आहे.
तामिळनाडूतील बहिष्कारामागे स्थानिक ब्रँड?
तामिळनाडूतील व्यापारी संघटनांनी कोका-कोला आणि पेप्सीको यांच्या शीतपेयांवर १ मार्चपासून बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपन्या भारतातील पैसा देशाबाहेर घेऊन जात असल्याचा आरोप करून हा बहिष्कार घालण्यात येत आहे. तथापि, यामागे स्थानिक शीतपेयांचे उत्पादक असू शकतात, अशी शक्यता बड्या कंपन्यांकडून व्यक्त होत आहे.
स्थानिक शीतपेय ब्रँड्सवर बड्यांची नजर
प्रादेशिक पातळीवर मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या स्थानिक शीतपेयांचा अभ्यास करण्यासाठी कोका-कोला आणि पेप्सीको या बहुराष्ट्रीय शीतपेय कंपन्यांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2017 02:17 AM2017-02-08T02:17:29+5:302017-02-08T02:17:29+5:30