BSNL Recharge Plan : जिओ, एअरटेल किंवा व्हीआय सारख्या सर्व खासगी टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन खूप महाग झाले आहेत. जर युजरनं स्वस्त प्लॅन खरेदी केला तर युजरला खूप कमी व्हॅलिडिटी दिली जाते, ज्यामुळे काही दिवसांनी पुन्हा रिचार्ज करावा लागतो. दीर्घ वैधता असलेले रिचार्ज प्लान युजर्ससाठी खूप महाग आहेत. या समस्येनं तुम्हीही त्रस्त असाल तर बीएसएनएलचा हा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो.
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आपल्या युजर्ससाठी इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच करत आहे. अनेक जण आपले नंबर बीएसएनएलवर ही पोर्ट करत आहेत. तुम्हीही कमी पैशात दीर्घ वैधता असलेला प्लॅन शोधत असाल तर तुमच्यासाठी बीएसएनएलचा हा प्लॅन बेस्ट ठरू शकतो. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला कमी पैशात दीर्घ वैधता तसंच अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाची सुविधा मिळेल.
बीएसएनएलचा ६६६ रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलचा दीर्घ वैधतेचा प्लॅन तुम्ही ६६६ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या प्लॅनच्या वैधतेबद्दल बोलायचं झालं तर या प्लॅनमध्ये तुम्हाला पूर्ण १०५ दिवसांची वैधता मिळते. बीएसएनएलच्या ६६६ रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला १०५ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. या प्लानमध्ये दररोज १०० फ्री एसएमएस आणि दररोज २ जीबी डेटाचाही समावेश आहे. संपूर्ण प्लानमध्ये तुम्हाला एकूण २१० जीबी डेटा दिला जाईल. या किंमतीत जिओ, एअरटेल आणि व्हीआयकडे एवढ्या दीर्घ वैधतेचा कोणताही रिचार्ज प्लॅन नाही.