जेव्हा तुम्ही रेफ्रिजरेटर, टेलिव्हिजन, वॉशिंग मशिन सारख्या वस्तू खरेदी करायला जाता, तेव्हा तुम्हाला अनेकदा त्यावर एक्सटेंडेड वॉरंटी घेण्यास सांगितलं जातं. परंतु तुम्हाला याचा अर्थ माहितीये? एक्सटेंडेड वॉरंटी ही अशी पॉलिसी आहे जी कंझ्युमर ड्युरेबल गुड्सच्या वॉरंटीचा कालावधी वाढवते. ही वॉरंटी मूळ वॉरंटीव्यतिरिक्त दिली जाते. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काही दोष किंवा ते वस्तू खराब झाल्यास त्या दुरुस्त करणं किंवा प्रोडक्ट बदलण्याची किंमत यात समाविष्ट असते.
काय कव्हर असतं काय नाही?
डिडक्टिबल रकमेचा भार विमा पॉलिसी घेणारी व्यक्ती उचलत असते. विमा कंपनी पॉलिसी खरेदी करताना ठरवलेल्या कपातीच्या वरील खर्च कव्हर करते. वस्तूच्या खरेदी किमतीतून डेप्रिसिएशन वजा केले जाते. कालांतराने कोणत्याही वस्तूचे मूल्य कमी होणे याला डेप्रिसिएशन म्हणतात.
क्लेमची माहिती?
क्लेमच्या बाबतीत, पॉलिसीधारकानं नुकसानीची माहिती त्वरित दिली पाहिजे. समस्या उद्भवल्याच्या १४ दिवसांच्या आत ही माहिती द्यावी.
सर्व्हेयरची नियुक्ती
नुकसान आणि उत्पादनाच्या प्रकारावर अवलंबून, विमा कंपनी नुकसानाची वास्तविकता आणि प्रमाण तपासण्यासाठी सर्व्हेयरची नियुक्ती करते. सर्व्हेअरच्या रिपोर्टच्या आधारे क्लेम मंजूर केला जातो.
कोणती कागदपत्रं हवी?
स्वाक्षरीसह योग्यरित्या भरलेला फॉर्म.
नुकसानीचं स्टेटमेंट.
इनव्हॉईस/रिपेअर बिलसोबत खराब झालेल्या वस्तूंची यादी.
या गोष्टी लक्षात ठेवा
विमा कंपनी एक्सटेंडेड वॉरंटी अंतर्गत बदललेला कोणताही डिफेक्टिव्ह पार्ट त्यांच्याकडे ठेवू शकते.
जर प्रोडक्टच्या अयोग्य वापरामुळे नुकसान झालं, तर वॉरंटीचा फायदा होणार नाही.