Lokmat Money > बिझनेस न्यूज > HDFC बँकेकडून कर्ज घेण्याच्या विचारात आहात? आणखी खिसा रिकामा करावा लागणार; पुन्हा वाढवले व्याजदर 

HDFC बँकेकडून कर्ज घेण्याच्या विचारात आहात? आणखी खिसा रिकामा करावा लागणार; पुन्हा वाढवले व्याजदर 

HDFC बँकेने कर्जाच्या दरात २५ बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. हे वाढलेले व्याजदर ७ जानेवारी २०२३ पासून लागू झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 01:06 PM2023-01-09T13:06:58+5:302023-01-09T13:07:32+5:30

HDFC बँकेने कर्जाच्या दरात २५ बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. हे वाढलेले व्याजदर ७ जानेवारी २०२३ पासून लागू झाले आहेत.

Looking to borrow from HDFC Bank Raised interest rates again home loan personal loan car loan emi increased mlcr rbi | HDFC बँकेकडून कर्ज घेण्याच्या विचारात आहात? आणखी खिसा रिकामा करावा लागणार; पुन्हा वाढवले व्याजदर 

HDFC बँकेकडून कर्ज घेण्याच्या विचारात आहात? आणखी खिसा रिकामा करावा लागणार; पुन्हा वाढवले व्याजदर 

HDFC Bank Hikes Interest Rate On Loan : जर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक HDFC कडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आता खिसा अजून जास्त रिकामा करावा लागेल. एचडीएफसीमधून कर्ज घेणाऱ्यांना आता अधिक ईएमआय भरावा लागणार आहे. HDFC बँकेने कर्जाचे दर 25 बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढवले ​​आहेत. हे वाढलेले व्याजदर 7 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने एमएलसीआरमध्ये वाढ केली आहे. दरम्यान, बँकेच्या वेबसाईटनुसार ओव्हरनाईट एमएलसीआर आता 8.30 टक्क्यांवरून आता 8.55 टक्के झाले आहे. यात 20 बेसिस पॉईंट्सची वाढ झाली आहे.

तीन महिने आणि सहा महिन्यांसाठी एमएलसीआर दर 8.35 टक्के ते 8.60 आणि 8.45 टक्के ते 8.70 टक्के असतील. एका वर्षाचा MCLR, जो अनेक ग्राहक कर्जांशी जोडलेला आहे, तो आता 8.60 टक्के ते 8.85 टक्के, दोन वर्षांचा एमएलसीआर 8.70 टक्क्यांवरून 8.95 टक्के आणि तीन वर्षांचा एमएलसीआर 8.80 टक्क्यांवरून 9.05 टक्के असेल.

असा वाढेल ईएमआय

  1. एचडीएफसी बँकेने कर्जाच्या कालावधीत आपला एमएलसीआर 25 बेसिस पॉइंटने वाढवला आहे. यामुळे आता गृह, वाहन, वैयक्तिक आणि इतर कर्जे महाग होणार आहेत आणि त्यामुळे आता तुमच्या ईएमआयच्या रकमेत वाढ होणार आहे. इतर बँकांनी आधीच रेपो रेटशी निगडीत होम लोन वाढवण्यास सुरुवात केली आहे.
  2. जर तुम्ही 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे कर्ज घेत असाल तर आता तुम्हाला 8.86 टक्के व्याजदराने दरमहा 26703 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. यापूर्वी, तुम्हाला 8.6 टक्के दराने दरमहा 26,225 रुपये ईएमआय भरावा लागत होता. आता 30 लाख रुपयांच्या कर्जावर तुमचा ईएमआय 478 रुपयांनी वाढेल.
  3. जर तुम्ही 50 लाख रुपयांचे कर्ज 20 वर्षांसाठी घेत असाल तर आता तुम्हाला 8.86 टक्के व्याजदराने दरमहा 43708 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. यापूर्वी, तुम्हाला 8.6 टक्के दराने दरमहा 44505 रुपये ईएमआय भरावा लागत होता. आता 50 लाख रुपयांच्या कर्जावर तुमचा ईएमआय 797 रुपयांनी वाढेल.

Web Title: Looking to borrow from HDFC Bank Raised interest rates again home loan personal loan car loan emi increased mlcr rbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.