Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयएल अ‍ॅण्ड एफएसचा तोटा ९० हजार कोटींवर

आयएल अ‍ॅण्ड एफएसचा तोटा ९० हजार कोटींवर

आयएल अ‍ॅण्ड एफएस समूहाने ३५० उपकंपन्यांचा डोलारा उभा केला परंतु तो सांभाळता न आल्याने समूहाचा तोटा ९० हजार कोटी रुपयांवर गेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 05:36 AM2018-12-05T05:36:19+5:302018-12-05T05:36:25+5:30

आयएल अ‍ॅण्ड एफएस समूहाने ३५० उपकंपन्यांचा डोलारा उभा केला परंतु तो सांभाळता न आल्याने समूहाचा तोटा ९० हजार कोटी रुपयांवर गेला आहे.

The loss of IL & FS is Rs 90,000 crore | आयएल अ‍ॅण्ड एफएसचा तोटा ९० हजार कोटींवर

आयएल अ‍ॅण्ड एफएसचा तोटा ९० हजार कोटींवर

मुंबई : आयएल अ‍ॅण्ड एफएस समूहाने ३५० उपकंपन्यांचा डोलारा उभा केला परंतु तो सांभाळता न आल्याने समूहाचा तोटा ९० हजार कोटी रुपयांवर गेला आहे. कंपनीच्या नवीन व्यवस्थापनाने केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या समितीला दिलेल्या माहितीत हे वास्तव समोर आले आहे. पत मानांकनापासून ते पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्त साहाय्य व सल्ला पुरवण्यासंबंधीत एकूण १२ प्रकारच्या व्यवसायात आयएल अ‍ॅण्ड एफएस समूह कार्र्यरत आहे. यासाठी समुहाने १२ कंपन्या तयार केल्या आहेत. त्याअंतर्गत भारतासह विदेशात ३५० उपकंपन्या कार्यरत आहेत. पण या सर्व कंपन्या कर्जावर सुरू आहेत. या कर्जाचे जुलै ते सप्टेंबरचे हफ्ते चुकले आहेत. समूह आर्थिक चणचणीत असल्याचे व्यवस्थापनाने अहवालात म्हटले आहे. समूहातील या समस्येमुळे केंद्र सरकारने आॅक्टोबर महिन्यात कोटक महिंद्रा बँकेचे डॉ. उदय कोटक यांच्या नेतृत्वात सहा सदस्यीय प्रशासक मंडळ नेमले होते.
>सीओओंची नियुक्ती
एन. सिवारामण यांची समूहाचे नवीन मुख्य परिचालन अधिकारी (सीओओ) म्हणून नियुक्ती झाली आहे. सिवारामण हे विनीत नय्यर यांना रिपोर्ट करणार आहेत.
नय्यर हे सध्या समूहाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. सिवारामण यांना या क्षेत्रातील तब्बल ३४ वर्षांचा अनुभव आहे.

Web Title: The loss of IL & FS is Rs 90,000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.