Join us  

गुंतवणूकदारांचे दीड लाख काेटींचे नुकसान, बॅंक संकटाने सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 9:23 AM

शेअर बाजार उघडताच माेठी घसरण झाली. सेन्सेक्स ४०० अंकांनी काेसळला. दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्स ९५४ अंकांनी घसरला.  मात्र, तेथून जवळपास ५०० अंकांनी सावरला.

मुंबई : अमेरिका आणि स्वित्झर्लंडमधील बॅंकिंग क्षेत्रातील हादऱ्यांचा फटका भारतालाही बसला. शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी माेठी पडझड झाली. सेन्सेक्स ३६१ अंकांनी काेसळून ५७,६२८ अंकांवर बंद झाला. निफ्टीही १११ अंकांनी घसरून १७ हजार अंकांच्या खाली आला आणि १६,९८८ अंकांवर बंद झाला. 

शेअर बाजार उघडताच माेठी घसरण झाली. सेन्सेक्स ४०० अंकांनी काेसळला. दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्स ९५४ अंकांनी घसरला.  मात्र, तेथून जवळपास ५०० अंकांनी सावरला. क्रेडिट सुईस आणि सिग्नेचर बॅंकांची अतिशय स्वस्तात विक्री झाली. तसेच खरेदी करणाऱ्या संस्थांना त्यांचा ताेटाही सहन करावा लागणार आहे. त्यामुळे बॅंकांच्या शेअर्समध्ये प्रचंड अस्थिरता दिसली. अमेरिकेतील बॅंकिंग संकटामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. त्यांना मंदीची भीती सतावित आहे. मात्र, तेथील फेडरल रिझर्व्हने संकट टाळण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रात बाजार सावरला. 

एका दिवसात बसला माेठा फटकासाेमवारी शेअर बाजार पडल्यामुळे गुंतवणूकदारांचे एका दिवसात १.५ लाख काेटी रुपयांचे नुकसान झाले. सेन्सेक्समधील कंपन्यांचे बाजार भांडवल २५७.५२ लाख काेटींवरून २५५.६४ लाख काेटी रुपये झाले.

फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे लक्षवित्तीय संस्था तसेच बॅंकांच्या समभागांमध्ये घसरण दिसून आली. तसेच अदानी समूहातील १० पैकी ९ कंपन्यांचे समभाग घसरले. आर्थिक मंदीच्या भीतीने गुंतवणूकदार शेअर बाजारापासून अंतर ठेवून आहेत. गुंतवणूकदारांना अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या  बैठकीत हाेणाऱ्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. तेथे व्याजदर वाढतात का, याकडे सर्वांचे डाेळे लागलेले आहेत.

टॅग्स :शेअर बाजार