Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिलायन्य कम्युनिकेशनला ५३१ कोटींचा तोटा

रिलायन्य कम्युनिकेशनला ५३१ कोटींचा तोटा

मुकेश अंबानी यांच्या जिओ सर्व्हिसचा आर्थिक फटका तसा अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांना जाणवत आहे. पण, याचा सर्वाधिक फटका त्यांचे लहान बंधू अनिल अंबानी यांना बसल्याचे स्पष्ट

By admin | Published: February 13, 2017 12:19 AM2017-02-13T00:19:17+5:302017-02-13T00:19:17+5:30

मुकेश अंबानी यांच्या जिओ सर्व्हिसचा आर्थिक फटका तसा अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांना जाणवत आहे. पण, याचा सर्वाधिक फटका त्यांचे लहान बंधू अनिल अंबानी यांना बसल्याचे स्पष्ट

Loss of Rs 531 crore to Reliance Communications | रिलायन्य कम्युनिकेशनला ५३१ कोटींचा तोटा

रिलायन्य कम्युनिकेशनला ५३१ कोटींचा तोटा

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या जिओ सर्व्हिसचा आर्थिक फटका तसा अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांना जाणवत आहे. पण, याचा सर्वाधिक फटका त्यांचे लहान बंधू अनिल अंबानी यांना बसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनला आॅक्टोबर - डिसेंबर २०१६ या काळात ५३१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. अर्थात, जिओने मोफत ४ जी सेवा दिल्यानेच हा तोटा झाल्याचे सांगण्यात येते.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनला गतवर्षी याच काळात ३०० कोटी रुपयांचा नफा झाला होता. रिलायन्स कम्युनिकेशनने एका निवेदनात सांगितले आहे की, कंपनीला या स्पर्धेच्या काळात ५३१ कोटींचा तोटा झाला आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Loss of Rs 531 crore to Reliance Communications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.