Join us

विक्रीच्या माऱ्याने गमावले ९४ हजार कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 12:35 PM

सप्ताहाचा प्रारंभ वाढीने झाल्यानंतर मात्र बाजार घसरतच गेला. या सप्ताहात परकीय वित्तसंस्थांनी ४४१०.९० कोटी रुपयांची विक्री केली तर देशांतर्गत वित्तसंस्थांनी ३९२६.५३ कोटी रुपयांची खरेदी केली; मात्र बाजाराची घसरण झालेलीच दिसून आली. धातू तसेच बँका व वित्तसंस्थांना मोठा फटका बसल्याचे दिसून आले.

प्रसाद गो. जोशी - 

जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले मंदीचे वातावरण, भारतामध्ये वाढू लागलेली कोरोनाची भीती, वाढलेल्या बाजारात नफा कमविण्यासाठी होत असलेली गर्दी आणि कंपन्यांचे काहीसे निराशाजनक अहवाल याचा परिणाम दोन सप्ताहांच्या वाढीला ब्रेक लागण्यात झाले. बाजाराच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना ९४,६१३.६७ कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले. 

सप्ताहाचा प्रारंभ वाढीने झाल्यानंतर मात्र बाजार घसरतच गेला. या सप्ताहात परकीय वित्तसंस्थांनी ४४१०.९० कोटी रुपयांची विक्री केली तर देशांतर्गत वित्तसंस्थांनी ३९२६.५३ कोटी रुपयांची खरेदी केली; मात्र बाजाराची घसरण झालेलीच दिसून आली. धातू तसेच बँका व वित्तसंस्थांना मोठा फटका बसल्याचे दिसून आले.

आयपीओनंतर लिस्टिंगलाच घसरल्या कंपन्या - भारतामधील सर्वात मोठा आयपीओ आणलेल्या पेटीएमच्या समभागांना शेअर बाजारातील लिस्टींगलाच मोठा फटका बसला; मात्र असा फटका आजपर्यंत अनेक कंपन्यांना बसला आहे. - सन २००८ पासून आयपीओच्या माध्यमातून पैसे उभारलेल्या १६४ पैकी १०० कंपन्यांना लिस्टींगच्या दिवशीच कमी किंमत मिळाली आहे. तसेच ज्या कंपन्यांना अधिक किंमत मिळाली, त्यापैकी केवळ ४४ कंपन्यांनीच दोन आकडी वाढ दिली आहे. या काळामध्ये सेन्सेक्सने मात्र दुपटीहून अधिक वाढ दिलेली दिसते. - कमी किमतीला नोंदणी झालेल्या कंपन्यांपैकी  कोल इंडिया, येस बँक, जीआयसी हाऊसिंग, एसबीआय कार्डस, न्यू इंडिया ॲशुरन्स, रिलायन्स पॉवर, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल, आयसीआयसीआय लोम्बार्ड या प्रमुख कंपन्या आहेत. या यादीवरून नजर फिरवल्यास त्यामध्ये सर्व प्रकारच्या (लार्ज, मिड आणि स्मॉलकॅप) कंपन्या असल्याचे दिसून येते. 

- आगामी सप्ताहात काहीही विशेष घडामोडी नाहीत. २५ रोजी डेरिव्हेटीव्हजची सौदापूर्ती असल्याने बाजार खाली-वर होऊ शकतो. बाकी सर्व काही जगभरातील शेअर बाजारांच्या वातावरणावर अवलंबून राहील. 

गतसप्ताहातील स्थितीनिर्देशांक    बंद मूल्य    फरकसेन्सेक्स      ५९,६३६.०१  (-)१०५०.६८निफ्टी       १७,७६४.८०   (-) ३३७.९५मिडकॅप     २२५,९१८.६२    (-)४६७.१६स्मॉलकॅप   २८,७९८.२३   (-) ४३४.३०  

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक