वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत देशातील विविध व्हिसा तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भारतातून शिक्षणासाठी त्याचप्रमाणे नोकऱ्यांसाठी अमेरिकेमध्ये जाणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिसा हे कोणासाठी दिले जातात ते जाणून घेऊया..
एच-१बी व्हिसा हा अमेरिकेत असलेल्या कंपन्यांना आपल्यासाठी विविध देशातून जे कर्मचारी बोलवावयाचे असतात त्यांच्यासाठी दिला जातो. एच ४ व्हिसा हा एच-१बी व्हिसाधारकांच्या अगदी नजीकच्या (पती/पत्नी, मुले इ.) नातेवाइकांना दिला जातो. एच-२बी व्हिसा हा ठरावीक काळासाठी किंवा नैमित्तिक नोकरी करणाºयांसाठी दिला जात असतो. जे १ हा व्हिसा मुख्यत: विद्यार्थी व प्रशिक्षण घेणाºयांसाठी असतो. हा व्हिसा इंटर्नशिप करणारे तसेच ट्रेनी विद्यार्थी यांना दिला जातो. ट्रम्प सरकारच्या निर्णयाने या वर्षाअखेरपर्यंत अमेरिकेत जाऊ इच्छिणाºयांचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही.
>अमेरिकेच्या व्हिसाबंदीमुळे कोणावर काय परिणाम होणार
व्हिसाचा प्रकार कोणासाठी लागू अमेरिकेतील स्टॅम्पची स्थिती ३१ डिसेंबरपर्यंत होणारा परिणाम
एच १ बी व्हिसा अमेरिकेबाहेरील स्टॅम्प मिळणार नाही अमेरिकेमध्ये प्रवेश मिळणार नाही
एच १ बी व्हिसा अमेरिकेबाहेरील ज्यांच्याकडे स्टॅम्प आहे काही फरक पडणार नाही
एच १ बी व्हिसा अमेरिकेमधील आय-७९७, आय- ९४ काहीही फरक पडणार नाही
एच ४ व्हिसा अमेरिकेबाहेरील एच ४ स्टॅम्प नाही अमेरिकेमध्ये प्रवेश मिळणार नाही
एच ४ व्हिसा अमेरिकेबाहेरील ज्यांच्याकडे एच ४ स्टॅम्प आहे काही फरक पडणार नाही
एच ४ व्हिसा अमेरिकेमधील आय-७९७, आय- ९४ काही फरक पडणार नाही
एच ४ व्हिसा इएडी अमेरिकेमधील इएडी असणारे काही फरक पडणार नाही
एल १, एल २ व्हिसा अमेरिकेबाहेरील एल १, एल २ स्टॅम्प नाही अमेरिकेमध्ये प्रवेश मिळणार नाही
एल १, एल २ व्हिसा अमेरिकेबाहेरील ज्यांच्याकडे एल १, एल २ स्टॅम्प आहे काहीही फरक पडणार नाही
एल १, एल २ व्हिसा अमेरिकेमधील आय-७९७, आय- ९४ काहीही फरक पडणार नाही
एल १ एल २ व्हिसा अमेरिकेमधील इएडी असणारे काही फरक पडणार नाही
एच २ बी व्हिसा अमेरिकेबाहेरील स्टॅम्प मिळणार नाही अमेरिकेमध्ये प्रवेश मिळणार नाही
एच २ बी व्हिसा अमेरिकेबाहेरील ज्यांच्याकडे एच २ बी स्टॅम्प आहे काही फरक पडणार नाही
एच २ बी व्हिसा अमेरिकेमधील आय- ९४ मान्यता काहीही फरक पडणार नाही
एफ १, एफ २ व्हिसा कुठलेही नागरिक काही फरक नाही काहीही फरक पडणार नाही
ओपीटी, स्टेम ओपीटी कुठलेही नागरिक काही फरक नाही काहीही फरक पडणार नाही
जे १ व्हिसा अमेरिकेबाहेरील स्टॅम्प मिळणार नाही अमेरिकेमध्ये प्रवेश मिळणार नाही
जे १ व्हिसा व्हिसा अमेरिकेबाहेरील ज्यांच्याकडे स्टॅम्प आहे काही फरक पडणार नाही
जे १ व्हिसा व्हिसा अमेरिकेमधील योग्य कागदपत्रे असलेले काही फरक पडणार नाही
बी १, बी २ व्हिसा कुठलेही नागरिक काही फरक नाही काहीही फरक पडणार नाही
टीएन, ०१, इ ३ व्हिसा कुठलेही नागरिक काही फरक नाही काहीही फरक पडणार नाही
अमेरिकेच्या व्हिसाबंदीमुळे भारतीयांना तोटा
एच ४ व्हिसा हा एच-१बी व्हिसाधारकांच्या अगदी नजीकच्या (पती/पत्नी, मुले इ.) नातेवाइकांना दिला जातो.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 02:43 AM2020-06-26T02:43:47+5:302020-06-26T02:44:00+5:30