Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणूकदारांची लागली लॉटरी! फक्त 5 रुपयांवरून थेट 1800 रुपयांवर पोहोचला 'हा' शेअर 

गुंतवणूकदारांची लागली लॉटरी! फक्त 5 रुपयांवरून थेट 1800 रुपयांवर पोहोचला 'हा' शेअर 

कॉस्मो फिल्म्सने म्हटल्यानुसार, कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने 1:2 च्या रेशोमध्ये बोनस शेअर इश्यू करण्यास मंजुरी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 02:02 PM2022-05-10T14:02:44+5:302022-05-10T14:03:18+5:30

कॉस्मो फिल्म्सने म्हटल्यानुसार, कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने 1:2 च्या रेशोमध्ये बोनस शेअर इश्यू करण्यास मंजुरी दिली आहे.

Lottery for investors! cosmo films shares went from just Rs 5 to Rs 1,800 company announced bonus share | गुंतवणूकदारांची लागली लॉटरी! फक्त 5 रुपयांवरून थेट 1800 रुपयांवर पोहोचला 'हा' शेअर 

गुंतवणूकदारांची लागली लॉटरी! फक्त 5 रुपयांवरून थेट 1800 रुपयांवर पोहोचला 'हा' शेअर 

शेअर बाजारात एका कंपनीने जबरदस्त परतावा दिला आहे. या कंपनीचा शेअर 5 रुपयांवरून थेट 1800 रुपयांवर पोहोचला आहे. कॉस्मो फिल्म्स (Cosmo Films) असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी आता आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देणार आहे. कॉस्मो फिल्म्स, आपल्या गुंतवणूकदारांना 1:2 या रेशोमध्ये बोनस शेअर देईल. कंपनीच्या शेअरने गेल्या एक वर्षात 170 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तर  यावर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सनी 34 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

गुंतवणूकदारांना 2 शेअरवर मिळेल 1 बोनस शेअर - 
कॉस्मो फिल्म्सने म्हटल्यानुसार, कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने 1:2 च्या रेशोमध्ये बोनस शेअर इश्यू करण्यास मंजुरी दिली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे 2 शेअर असतील, त्यांना 1 बोनस शेअर मिळेल. कॉस्मो फिल्म्सने अद्याप बोनस शेअरच्या रेकॉर्ड डेटची घोषणा केलेली नाही. कॉस्मो फिल्म्स BOPP फिल्म मॅन्युफॅक्चरर, सप्लायर आणि प्रॉड्यूसर आहे. याकंपरनीचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर मंगळवारी 1852 रुपयांवर ट्रेड करत होता.

5 रुपयांवरून थेट 1800 रुपयांवर पोहोचला शेअर -
कॉस्मो फिल्म्सचा शेअर 8 जानेवारी 1999 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये 5 रुपयांवर होता. तर 10 मे 2022 रोजी हा शेअर 1852 रुपयांवर आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 8 जानेवारी 1999 रोजी कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आता त्याचे 3.7 कोटी रुपये झाले असते. कॉस्मो फिल्म्सच्या शेअर्सनी गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना तब्बल 19 टक्कांचा परतावा दिला आहे. तर गेल्या पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्सनी 321 टक्के ऐवढा परतावा दिला आहे.
 

Web Title: Lottery for investors! cosmo films shares went from just Rs 5 to Rs 1,800 company announced bonus share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.