Lokmat Money > बिझनेस न्यूज > Ration Card : फ्री रेशन मिळणाऱ्यांची लॉटरी! सरकारनं नियम बदलले, आता मिळणार जादा रेशन!

Ration Card : फ्री रेशन मिळणाऱ्यांची लॉटरी! सरकारनं नियम बदलले, आता मिळणार जादा रेशन!

1 जानेवारीपासून जवळपास 80 कोटीहून अधिक लोकांना मोफत खाद्यान्नाची सुविधा मिळेल. महत्वाचे म्हणजे या योजनेत आपल्याला संपूर्ण वर्षभर मोफत धान्याचा लाभ मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 05:02 PM2023-01-12T17:02:38+5:302023-01-12T17:03:48+5:30

1 जानेवारीपासून जवळपास 80 कोटीहून अधिक लोकांना मोफत खाद्यान्नाची सुविधा मिळेल. महत्वाचे म्हणजे या योजनेत आपल्याला संपूर्ण वर्षभर मोफत धान्याचा लाभ मिळेल.

Lottery of Free Ration The Narendra Modi government changed the rules, now you will get 35 kg ration free | Ration Card : फ्री रेशन मिळणाऱ्यांची लॉटरी! सरकारनं नियम बदलले, आता मिळणार जादा रेशन!

Ration Card : फ्री रेशन मिळणाऱ्यांची लॉटरी! सरकारनं नियम बदलले, आता मिळणार जादा रेशन!

मोफत रेशनची सुविधा मिळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर आपणही पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा (PMGKAY) लाभ घेत असाल, तर आतापासून आपल्याल दर महिन्याला 35 किलो धान्य मोफत मिळेल. मोदी सरकारने या नव्या वर्षात हा मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.

1 जानेवारीपासून जवळपास 80 कोटीहून अधिक लोकांना मोफत खाद्यान्नाची सुविधा मिळेल. महत्वाचे म्हणजे या योजनेत आपल्याला संपूर्ण वर्षभर मोफत धान्याचा लाभ मिळेल. तर जाणून घेऊयात, कोणत्या लोकांना दर महिन्याला मोफत मिळत जाणार 35 किलो रेशन...

2023 मध्ये दर महिन्याला मिळणार मोफत रेशन -  
यासंदर्भात माहिती देताना अन्नपुरवठा मंत्रालयाने म्हटले आहे की, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत रेशनची सुविधा दिली जात आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, 2023 मध्ये लाभार्थ्यांना रेशनची चिंता करावी लागणार नाही. सरकारने 2023 मध्ये वर्षभर मोफत रेशन सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत आपल्याला मोफत अन्नधान्य मिळेल.

कुणाला मिळणार दर महिन्याला 35 किलो मोफत रेशन? -
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, NFSA अंतर्गत प्राधान्यावर असलेल्या कुटुंबीयांना दर महिन्याला प्रतिव्यक्ती फ्री रेशनची सुविदा मिळेल. सरकारने म्हटले आहे, की प्रत्येक लाभार्थ्याला 5 किलो एवढे फ्री रेशन मिळेल. तसेच, अंत्योदय अन्न योजनेंतर्गत कुटुंबांसाठी 35 किलोग्रॅम प्रती कुटुंब या दराने दर महिन्याला रेशन मिळेल.

सरकारवर पडणार 2 लाख कोटी रुपयांचा बोजा - 
सरकार गरिबांना डोळ्यासमोर ठेऊन विशेष सुविधा सुरू केली आहे. अन्नपुरवठा अनुदानाच्या रूपात सरकार या वर्षी अर्थात 2023 मध्ये 2 लाख कोटी रुपयांहूनही अधिकचा खर्च करणार आहे. यामुळे देशातील गरीब आणि इतरही काही वर्गांतील नागरिकांना अन्न-धान्यासाठी चिंता करावी लागणार नाही.
 

Web Title: Lottery of Free Ration The Narendra Modi government changed the rules, now you will get 35 kg ration free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.