लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अमेरिकेसह इतर विकसित देशांमध्ये आर्थिक मंदी येण्याच्या भीतीने अनेक बड्या कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, नोकरभरतीला ब्रेक लागला आहे. असे असताना दुसरीकडे भारतात मात्र सप्टेंबर तिमाहीमध्ये नोकऱ्यांमध्ये तब्बल ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जागतिक तंत्रज्ञान कंपन्या सध्या कर्मचारी कपात करत असून, मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबुक, ॲपल ओरेकल आणि ट्वीटरसारख्या मोठ्या कंपन्यांनी नोकर भरतीला ब्रेक लावला आहे, तर भारतात कोरोना साथ कमी झाल्याचा परिणाम म्हणून नव्या नोकऱ्या निर्माण होताना दिसत आहेत. जून तिमाहीमध्येही ५४ टक्केपेक्षा अधिक नोकर भरती झाली आहे. कोरोनामुळे गावी गेलेले लोक पुन्हा कामावर परतू लागल्याचे या आकडेवारीतून दिसून येत आहे. ४३,३९९ लोकांची कपात जगभरात स्टार्टअपमधून या वर्षी केली आहे. सर्वाधिक कर्मचारी मायक्रोसॉफ्टने काढले आहे.
भारताचे आयटी क्षेत्र नोकर भरती
जून तिमाही ७५% सप्टेंबर तिमाही ८३%
पदवीधर बेरोजगार का वाढले?
- देशात सध्या बेरोजगारी कमी होत असली तरीही शिकलेले तरुण अद्याप नोकरीसाठी कंपन्यांच्या पायऱ्या झिजवत आहेत.
- २०१७ मध्ये पदवीधर तरुण बेरोजगारांचा दर ११ टक्के होता, तो २०२२ मध्ये वाढून १७.८ टक्के झाला आहे.
- सध्या देशातील १०० पदवीधरांपैकी १८ जणांना नोकरी नाही.
या शहरांत अधिक नोकऱ्याबंगळूरू ९५% चेन्नई ८७% मुंबई ८३% हैदराबाद ७५% दिल्ली ७८% पुणे ६६%