Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Booking: फक्त एका Missed Call वर घरी येईल गॅस सिलिंडर; जाणून घ्या प्रोसेस...

LPG Booking: फक्त एका Missed Call वर घरी येईल गॅस सिलिंडर; जाणून घ्या प्रोसेस...

LPG Booking: मिस्ड कॉल व्यतिरिक्त, गॅस बुक करण्याचे इतर मार्ग आहेत. IOC, HPCL आणि BPCL चे ग्राहक SMS आणि Whatsapp द्वारे देखील गॅस सिलिंडर बुक करू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 02:40 PM2021-12-12T14:40:09+5:302021-12-12T14:41:27+5:30

LPG Booking: मिस्ड कॉल व्यतिरिक्त, गॅस बुक करण्याचे इतर मार्ग आहेत. IOC, HPCL आणि BPCL चे ग्राहक SMS आणि Whatsapp द्वारे देखील गॅस सिलिंडर बुक करू शकतात.

LPG Booking: Refill LPG cylinder by giving a MISSED CALL on THIS number - Check PRICES and FULL DETAILS here | LPG Booking: फक्त एका Missed Call वर घरी येईल गॅस सिलिंडर; जाणून घ्या प्रोसेस...

LPG Booking: फक्त एका Missed Call वर घरी येईल गॅस सिलिंडर; जाणून घ्या प्रोसेस...

नवी दिल्ली : LPG Booking: एलपीजी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हालाही स्वयंपाक घरातील गॅस बुकिंग करण्यासाठी अडचणी येत असतील तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे. गॅस सिलिंडर बुक करणे सोपे झाले आहे. आता गॅस सिलिंडरसाठी तुम्हाला फक्त मिस कॉल द्यावा लागेल. यानंतर सिलिंडर तुमच्या दारात येईल. दरम्यान, इंडियन ऑइल (IOC) आपल्या ग्राहकांना ही सेवा पुरवत आहे.

या अंतर्गत, तुम्ही फक्त मिस कॉल करून तुमचा एलपीजी सिलिंडर देशाच्या कोणत्याही भागात बुक करू शकता. इंडियन ऑइलने याच वर्षी फेब्रुवारीमध्ये मिस्ड कॉलद्वारे एलपीजी सिलिंडर बुक करण्याची सुविधा सुरू केली होती. यापूर्वी ग्राहकांना कस्टमर केअरमध्ये जाऊन बराच वेळ कॉल होल्ड करून ठेवावा लागत होता, मात्र आता तसे करण्याची गरज नाही. फक्त एक मिस कॉल केला तर गॅस सिलिंडर तुमच्या दारात पोहोचवला जाईल.

इंडियन ऑइलने आपल्या एलपीजी ग्राहकांना ट्विटद्वारे याची माहिती दिली आहे. इंडियन ऑइलने मिस्ड कॉलसाठी नंबर देखील दिला केला आहे, जो 8454955555 आहे. तुम्हाला फक्त तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 8454955555 या नंबरवर कॉल करायचा आहे. तसेच,  इंडियन ऑइलने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आता तुम्ही या नंबरवर मिस्ड कॉल देऊन नवीन गॅस कनेक्शन बुक करू शकता. विशेष म्हणजे यासाठी ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

दुसऱ्या पद्धतीनेही बुक करू शकता गॅस सिलिंडर
मिस्ड कॉल व्यतिरिक्त, गॅस बुक करण्याचे इतर मार्ग आहेत. IOC, HPCL आणि BPCL चे ग्राहक SMS आणि Whatsapp द्वारे देखील गॅस सिलिंडर बुक करू शकतात.

IOC चे ग्राहक असे करू शकतात गॅस बुकिंग
तुम्ही इंडेन ग्राहक असल्यास, तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7718955555 वर कॉल करून एलपीजी गॅस सिलिंडर बुक करू शकता. दुसरा मार्ग म्हणजे Whatsapp, तुम्ही 7588888824 वर REFILL लिहून Whatsapp करू शकता. गॅस सिलिंडर तुमच्या दारात पोहोचवला जाईल.

HP चे ग्राहक असाल तर असे करा बुकिंग
HP चे ग्राहक  9222201122 वर Whatsapp मेसेज पाठवून LPG सिलिंडर बुक करू शकतात. तुम्हाला फक्त तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून BOOK टाईप करून 9222201122 या क्रमांकावर पाठवावे लागेल. या क्रमांकावर तुम्ही सबसिडीशी संबंधित माहिती देखील मिळवू शकता.

Bharat Gas च्या ग्राहकांसाठी बुकिंग प्रक्रिया
भारत गॅस ग्राहकाने नोंदणीकृत मोबाईलवरून 1 किंवा 1800224344 या क्रमांकावर बुक पाठवावे. यानंतर एजन्सी तुमची बुकिंग रिक्वेस्ट स्वीकारेल आणि तुमच्या व्हॉट्सअॅप नंबरवर अलर्ट येईल.

Web Title: LPG Booking: Refill LPG cylinder by giving a MISSED CALL on THIS number - Check PRICES and FULL DETAILS here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.