Join us

LPG सिलिंडरचीही असते एक्स्पायरी डेट, जाणून किती असते त्याची लाईफ; कोडमध्ये लपलीये माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 6:20 PM

भारतात एलपीजीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे.

LPG Cylinder: भारतात एलपीजीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन गॅस सिलिंडर खरेदी करताना बहुतेक लोक आधी सिलिंडरमधून गॅस गळती होत आहे की नाही इतकंच तपासतात. याशिवाय अनेक वेळा आपण त्याचे वजनही तपासलं जातं. मात्र सिलिंडरची एक्सपायरी डेट कधीही तपासून पाहत नाहीत. परंतु एलपीजी सिलेंडरची एक्सपायरी डेट देखील असते. ही एक्सपायरी डेट प्रत्येक सिलेंडरवर मोठ्या अक्षरात लिहिलेली असते. ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.हल्ली बहुतांश घरांमध्ये गॅस सिलिंडर बसवण्यात आले आहेत. त्यातही काळानुरूप बदल झाले आहेत. अनेक ठिकाणी आता पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा केला जात आहे. याचा अर्थ सिलिंडरच्या त्रासातूनही आपली सुटका झाली आहे.कुठे असते एक्सपायरी डेट?जेव्हाही सिलिंडर विक्रेता तुमच्या घरी गॅस सिलिंडर आणतो तेव्हा सर्वप्रथम त्या सिलिंडरची एक्सपायरी डेट तपासा. सिलेंडरच्या वरच्या भाग म्हणजेच राऊंड पार्टच्या खाली जी पट्टी असते त्यावर एक इंग्रजी अक्षर आणि एक नंबर लिहिलेला असतो. तो एक कोड असतो आणि त्यालाच एक्स्पायरी डेट म्हणतात. जेव्हा तुम्ही गोल भागाच्या खाली असलेल्या पट्टीकडे पहाल तेव्हा एक पिवळी किंवा हिरवी पट्टी दिसेल. ज्यावर पांढऱ्या किंवा काळ्या रंगात अंक लिहिलेला असतो. जर तुमच्या गॅस सिलिंडरवर A-25 लिहिलेले असेल तर याचा अर्थ या सिलिंडरची एक्सपायरी जानेवारी ते मार्च २०२५ मध्ये आहे. त्यावर लिहिलेली A ते D अक्षरे महिन्याची माहिती देतात आणि संख्या वर्षाची माहिती देतात.

 ABCD चा अर्थ काय?या कोडमध्ये, ABCD प्रत्येकी तीन महिन्यांत विभागलेला आहे. A म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. त्याचप्रमाणे B म्हणजे एप्रिल, मे आणि जून. त्याचप्रमाणे C म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. त्याचप्रमाणे डी म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. आता जर तुमच्या सिलिंडरवर A-24 लिहिलेले असेल, तर त्याचा अर्थ असा की तुमचा सिलिंडर २०२४ मध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान एक्सपायर होईल. जर D-27 लिहिले असेल तर याचा अर्थ असा आहे की सिलिंडरची एक्सपायरी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२७ मध्ये आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सिलिंडरवर लिहिलेली एक्सपायरी डेट देखील जाणून घेऊ शकता.का लिहितात एक्सपायरी?सिलेंडरवर लिहिलेली ही तारीख टेस्टिंगची तारीख आहे. याचा अर्थ असा की, या तारखेला सिलिंडर टेस्टिंगसाठी पाठवला जातो. सिलिंडर पुढील वापरासाठी योग्य आहे की नाही हे पाहिलं जातं. सिलिंडर तपासताना त्याची हायड्रो टेस्ट केली जाते. याशिवाय ५ पट जास्त दाब देऊनही त्याची चाचणी केली जाते. चाचणी दरम्यान, मानकांची पूर्तता न करणारे सिलिंडर नष्ट केले जातात.एलपीजी गॅस सिलिंडरचे आयुष्य साधारणपणे १५ वर्षे असते. या दरम्यान सिलिंडर दोनदा चाचणीसाठी पाठवला जातो. पहिली चाचणी १० वर्षांनी आणि दुसरी चाचणी ५ वर्षांनी केली जाते.

टॅग्स :व्यवसाय