सध्या देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती झपाट्यानं वाढत आहेत. पेट्रोलनं तर अनेक ठिकाणी शंभरी पार केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर मोठ्या प्रमाणात ताण पडतोय. असं असलं तरी दुसरीकडे पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आज पुन्हा एकदा सरकारी कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. महिन्याभरात झालेली ही तिसरी वाढ आहे. या वाढीनंतर विना अनुदानित १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ७६९ रूपयांवरून वाढून ७९४ रूपये झाली आहे. २५ फेब्रुवारीपासून हे नवे दर लागू झाले आहेत. विना अनुदानित सिलिंडरच्या दरात २५ रूपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
१ डिसेंबर रोजी सिलिंडरचे दर ५९४ रूपयांवरून वाढून ६४४ रूपये झाले होते. यानंतर १ जानेवारी रोजी पुन्हा यात ५० रूपयांची वाढ करण्यात आली. त्यानंतर हे गर ६९४ रूपयांवर पोहोचले. ४ फेब्रुवारी रोजी पुन्हा सिलिंडरच्या दरात करण्यात आलेल्या वाढीनंतर हे दर ७१९ रूपयांवर पोहोचले. तसंच १५ फेब्रुवारी रोजी पुन्हा दरात वाढ झाल्यानंतर हे दर ७६९ रूपये झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा २५ फेब्रुवारी रोजी २५ रूपयांनी सिलिंडरचे दर वाढवणअयात आले आहे.
प्रमुख शहरांतील विना अनुदानित १४.२ किलोच्या सिलिंडरच्या किंमती
- मुंबई - ७९४ रूपये
- दिल्ली - ७९४ रूपये
- कोलकाता - ८२२ रूपये
- लखनौ - ८३२ रूपये
- आग्रा - ८०७ रूपये
- जयपूर - ८०५ रूपये
- पाटणा - ८८४ रूपये
- इंदूर - ८२२ रूपये
- पुणे - ७९८ रूपये
- अहमदाबाद - ८०१ रूपये