नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. आताच जुलै महिन्याच्या सुरुवातीला विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ झाली आहे. तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत 84 रुपयांनी वाढली आहे. त्यातच पेटीएमने (Paytm) एक खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला गॅस सिलिंडरच्या बुकींगवर तब्बल 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. म्हणजेच सिलिंडरवर जवळपास 900 रुपयांचा फायदा होऊ शकतो.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ग्राहकांना गॅस सिलिंडर बुकींगवर मिळणाऱ्या या ऑफरबद्दलची माहिती दिली आहे. यानुसार तुम्हाला पेटीएमवर खास पद्धतीने बुकींग करुन कॅशबॅक मिळू शकतो. पेटीएमने नुकतंच ग्राहकांसाठी ही खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरनुसार, जो ग्राहक पहिल्यांदा पेटीएम App द्वारे एलपीजी सिलिंडर बुक करेल त्याला 900 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. विशेष म्हणजे सिलिंडर बुक करण्यासाठी लिंक देखील देण्यात आली आहे.
Get up to ₹900 cashback while booking your #Indane LPG refill on @Paytm. Book now: https://t.co/4xn4H7wD7R. Terms & Conditions Apply. #LPGBookingpic.twitter.com/gFOsDcnWym
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) July 20, 2021
असा करा सिलिंडर बुक
- सर्वप्रथम तुम्हाला पेटीएम अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.
- लॉगिन केल्यानंतर Book a Cylinder या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- तुम्ही थेट सर्च ऑप्शनवर जाऊन त्यात Recharge And Bill Pay या ऑप्शनवर क्लिक करू शकता.
- यामध्ये तुम्हाला भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅस असे तीन पर्याय मिळतात. त्यात तुम्ही गॅस सिलिंडर प्रोव्हायडरवर क्लिक करा.
- गॅस प्रोव्हायडरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर किंवा LPG ID क्रमांक टाकावा लागेल.
- यानंतर पुढील प्रोसेस फॉलो करुन तुम्ही सिलिंडर बुक करू शकता. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.