Join us

LPG Cylinder Booking : एलपीजी गॅस बुकिंगवर मिळवा 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक! जाणून घ्या कसा?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 3:31 PM

LPG Cylinder Booking : सध्या पेटीएमवर गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी 4 कॅशबॅक ऑफर्स सुरू आहेत.

नवी दिल्ली :  तुम्ही एलपीजी सिलिंडर बुकिंग (LPG Cylinder Booking) अनेक प्रकारे करू शकता. तेल कंपनीच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून तुम्ही एलपीजी सिलिंडर बुक करू शकता. तसेच, हे काम तुम्ही ऑनलाईन देखील करू शकता. तुम्ही पेटीएमद्वारे (Paytm) एलपीजी सिलिंडर देखील बुक करू शकता.

जर तुम्ही पेटीएम वरून सिलिंडर बुक केल्यास तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. सध्या पेटीएमवर एलपीजी गॅसच्या बुकिंगवर शानदार ऑफर्स (Paytm LPG Offers) सुरू आहे. या अंतर्गत, तुम्हाला एलपीजी बुकिंगवर 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक (Cashback) मिळू शकते.

सध्या पेटीएमवर गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी 4 कॅशबॅक ऑफर्स सुरू आहेत. या ऑफर्समध्ये 5 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जात आहे. पहिल्या कॅशबॅक ऑफरचा प्रोमोकोड GAS1000 आहे. या प्रोमोकोडचा वापर करून, ग्राहकाला 5 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. याचबरोबर, प्रोमोकोड FREEGAS ऑफरमध्ये सुद्धा 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक गॅस सिलिंडर बुक करणाऱ्या प्रत्येक 500 व्या ग्राहकाला दिला जात आहे.

पेटीएम AU क्रेडिट कार्डने सिलिंडरसाठी पेमेंट केल्यास 50 रुपयांपर्यंत सूट देत आहे. या ऑफरचा प्रोमोकोड AUCC50 आहे. येस बँकेच्या क्रेडिट कार्डने पेटीएमवर गॅस सिलिंडरचे पेमेंट केल्यास 30 रुपयांची सूट देखील मिळत आहे. यासाठी बुकिंग करताना प्रोमोकोड GASYESCC टाकावा लागेल.

Paytm द्वारे करा असे करू शकता बुकिंग- सर्वात आधी Paytm अॅप ओपन करावे लागेल.- यानंतर थोडे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला Book gas Cylinder चा ऑप्शन मिळेल. त्यावर टॅप करावे लागेल.- त्यानंतर तुम्हाला तुमचा गॅस प्रोव्हायडर सिलेक्ट लागेल. यामध्ये Bharatgas, HP Gas, Indane यांचा समावेश आहे.- यानंतर तुम्हाला तुमचा एलपीजी आयडी किंवा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकावा लागेल.- आता खाली दिलेल्या Proceed वर टॅप करावे लागेल.-  यानंतर जे पेज ओपन होईल त्याच्या खाली Apply Promocode लिहिलेले असेल, त्यावर क्लिक करा.- येथे तुम्हाला ज्या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे, त्याचा प्रोमो कोड टाकावा लागेल.- प्रोमो कोड टाकल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल. तुम्ही पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला कॅशबॅक मिळेल.

टॅग्स :गॅस सिलेंडरव्यवसायपे-टीएम